Sanjay Raut Latest Marathi News, Shivsena News
Sanjay Raut Latest Marathi News, Shivsena NewsSaam Tv

Sanjay Raut : संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका, म्हणाले...

Sanjay Raut on Devendra Fadnavis: आज तुमच्याबरोबर असलेल्या शेळ्या मेंढ्या तिथे नव्हत्या. तिथे वाघच होते. देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्राची दिशाभूल करतात, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं आहे.
Published on

Sanjay Raut:

देवेंद्र फडणवीस हे शूर्पणखेच्या भूमिकेत शिरले आहेत. ते महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्यावरून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी टीकास्त्र सोडलंय.

Sanjay Raut Latest Marathi News, Shivsena News
Aaditya Thackeray आणि Sanjay Raut यांच्या विरोधात भाजप आक्रमक

रामाचं श्रेय जरूर घ्या, पण प्रभू श्रीराम हे तुम्हाला श्रेय घ्यायला देतील की नाही हे 2024 च्या निवडणुकीत कळेल. दैनिक सामनावरच 150 खटले दाखल झाले होते. मी स्वतः सीबीआयच्या लखनऊ कोर्टात गेलो होतो. आज तुमच्याबरोबर असलेल्या शेळ्या मेंढ्या तिथे नव्हत्या, तिथे वाघच होते. देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं आहे.

बाळासाहेब वाघ आहेत तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेले डाग आहेत. बाळासाहेबांनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं. बाबरी कोसळली त्यावेळी या घडामोडींमध्ये विशेष न्यायालय स्थापन झालं. त्यातल्या आरोप पत्रात आरोपींची नावे फडणवीसांनी पहावेत आणि त्यात किती शिवसैनिक आहेत हे महाराष्ट्राला सांगावं, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत आहेत. ते वाघ होते, मात्र उद्धव ठाकरेंनी राम मंदिरासाठी काय केलं? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विचारला होता. जेव्हा संघर्ष झाला तेव्हा उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे कुठे होते? त्यांचा आंदोलनाशी काहीही संबंध नाही. उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व केवळ भाषणापुरतं आहे, असं फडणवीस म्हणाले होते.

Sanjay Raut Latest Marathi News, Shivsena News
मराठा - ओबीसी वादासंदर्भात Raj Thackeray यांनी केलेल्या दाव्याला जरांगेंचं प्रत्युत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com