MLA disqualification : विधानसभेच्या अध्यक्षांनी ठाकरे गटातील आमदार पात्र का ठरवले? काय आहेत त्यामागील कारणं?

Narwekar Decision On Thackeray Group: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेचा निकाल बुधवारी दिला. हा निकाल देताना नार्वेकरांनी दोन्ही गटाला दिलासा दिला. या निर्णयामुळे ठाकरे गटाला दिलासा जरी मिळाला असेल तरी या निर्णयाने उद्धव ठाकरेंचा पराभव झाल्याचं म्हटलं जात आहे. ठाकरे गटाच्या आमदरांना पात्र करण्यामागे कोणती कारणे आहेत, ते जाणून घेऊ...
Narwekar Decision On Thackeray Group
Narwekar Decision On Thackeray Groupsaam Tv

Why Vidhan Sabha Speaker Not disqualified Thackeray Group MlA:

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या आमदार अपात्रतेचा निकाल बुधवारी लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदेच्या गटाला खरी शिवसेना घोषित केलं आणि सर्व आमदारांना पात्र केलं. त्याचवेळी नार्वेकरांनी ठाकरे गटातील १४ आमदारांनाही पात्र केलं. यामुळे दोन्ही पक्षाला दिलासा मिळाला, पण हा दिलासा मिळाला असला तरी राहुल नार्वेकरांच्या निकालावर प्रश्न उपस्थित होत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून नार्वेकरांवर आरोप केला जात आहे. तर विधानसभा अध्यक्षांच्या या निकालाविरुद्धात सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. (Latest News)

राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयावरून दोन्ही गटातील नेते आरोप-प्रत्यारोप करत आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) निकालविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाणार असल्याचं म्हटलंय. त्याला उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलंय. ठाकरे गटातील आमदार देखील पात्र झालेत. मग आम्ही त्यानिर्णयाविरोधात गेलं पाहिजे असं म्हटलंय. दरम्यान विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटातील आमदारांना पात्र करण्यामागे कारण काय असा प्रश्न केला जात आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिंदे गटाच्या बाजुने निकाल लागेल असं ठाकरे गटातील नेते म्हणत होते. त्यामुळे नार्वेकर ठाकरे गटातील १४ आमदारांना सहज अपात्र करू शकत होते. कारण नार्वेकरांनी शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी बजावलेला व्हीप मान्य केला. त्यामुले ठाकरे गटातील आमदार अपात्र होणं सहज शक्य होतं.

Narwekar Decision On Thackeray Group
MLA Disqualification Result: आधी धक्का नंतर दिलासा; राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाचे आमदारही ठरवले पात्र

काय आहेत कारणं?

राहुल नार्वेकरांचा दोन्ही गटाला दिलासा देण्याचा निर्णय हा भाजपच्या पथ्यावर पडणारा आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत (Lok sabha) या निर्णयचा फायदा भाजपला होणार असल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त दिलंय. जर दोन्ही गटातील आमदार अपात्र ठरवले गेले असते.तर भाजपला लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागले असते.लोकसभा निवडणुकीच्या निकालावर या आमदार अपात्रतेच्या निकालाचा परिणाम झाला असता. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजपला पराभवाची चव चाखावी लागली असते.

ठाकरेंना मिळाली असते सहानभुती

ठाकरे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेमुळे भाजपची कोंडी झाली असती. पण या निकालामुळे उद्धव ठाकरे पराभूत होऊनही जिंकले असते. कारण लोकसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना सहानभुती मिळाली असती. ते जनतेला भाजपच्या कारभाराचा पाढा वाचला असता आणि लोकांची सहानभुती मिळवली असती.

शिवसेना हा भावनांच्या जोरावर फुलणारा पक्ष आहे. त्यामुळे जनमानसात सहानुभूती निर्माण झाली असती. कारण एकनाथ शिंदेंनी ज्यावेळी बंड केला होता आणि शिवसेना फोडली होती त्यावेळी जनमानसात ठाकरेंविषयी सहानभुतीची लाट उसळली होती. त्याचा फायदा ठाकरे गटाला मिळत होते. ठाकरेंना मिळणारी सहानभुती भाजपच्या विजयासाठी घातक ठरू शकली असती.

शिवसेना एक भावना , जनभावना असल्याचं म्हटलं जातं. त्यात ठाकरे कुटुंबावर अन्याय झाला तर त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते आक्रमक होत असतात. त्यामुळे जर नार्वेकरांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं असतं तर त्याचा परिणाम निवडणुकांना दिसला असता. तसेच ठाकरे गटाला विजय सोपा झाला असता.

शिंदे गट अपात्र झाला असता तर

जर विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या विरोधात निकाल देत त्यांचे १६ आमदार अपात्र ठरवले असते. तर भाजप मित्र पक्षाचा बळी घेत असतो असा समज जनमानसात गेला असता त्यात भाजपचा तोटा झाला असता. आमदार अपात्र होताच शिंदेंच्या नेतृत्त्वात चालत असलेले सरकार हे असंवैधानिक असल्याचं शिक्कामोर्तब झालं असतं.

हाही संदेश लोकांमध्ये गेला असता. त्यामुळे भाजपला पराभवाचा सामना करावा लागला असता. या निर्णयात भाजपचा फायदा झालाय. यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेलाय. राहुल नार्वेकरांचा निर्णय चुकीचा किंवा स्थगित झाला तर भाजपला अडचणीत पकडता येईल.

Narwekar Decision On Thackeray Group
Thackeray Group: उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; अपात्रता निकालानंतर ठाकरे गटातला एक गट नाराज, सूत्रांची माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com