Thackeray Group: उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; अपात्रता निकालानंतर ठाकरे गटातला एक गट नाराज, सूत्रांची माहिती

Thackeray group : शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला. यानंतर ठाकरे गटात धूसपूस सुरू झालीय.
Thackeray group
Thackeray group saam Tv

(गिरीश कांबळे)

Thackeray Faction Upset :

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेविषयी निकाल दिला. शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं म्हणत नार्वेकरांनी ठाकरे गटाला धक्का दिला. निकालाच्या धक्क्यानंतर ठाकरे गटाला अजून एक धक्का मिळण्याची शक्यता आहे. कालच्या निकालानंतर उद्धव गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली असून एकाच गटात दोन गट तयार झाली आहेत. (Latest News)

घटनादुरुस्तीची नोंद निवडणूक आयोगात न केल्याचं खापर अनिल देसाई आणि सुभाष देसाईंवर फोडण्यात येत आहे. २०१८ ला पक्षाच्या घटनेतील बदलांची निवडणूक आयोगात नोंद का नाही यावरून पक्षात खडाजंगी होऊ लागलीय. पक्षातील प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे याप्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान आमदार अपात्रतेवर (MLA Disqualification) निकाल देता राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) निवडणूक आयोगाकडे (Election Comission) असलेल्या १९९९ सालच्या शिवसेनेच्या (Shiv Sena) घटनेचा आधार घेतला. २०१८ सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नसल्याचं नार्वेकर म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान २०१८ सालची शिवसेनेच्या घटनेत झालेल्या बदलाची माहिती निवडणूक आयोगाकडे देण्यात आली नव्हती. पक्षाच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्यावर सोपवण्यात आली होती.

घटनादुरुस्ती नेमकी काय आहे?

• १९९९ साली शिवसेनेच्या घटनेमध्ये शिवसेना प्रमुख हे मुख्य पद होतं

• बाळासाहेबांच्या निधनानंतर हे पद रिक्त राहिलं

• 2018 साली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

• या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख हे नवीन पद घटनेत समाविष्ट केलं

• शिवसेना प्रमुख या पदानंतर पक्षप्रमुख या पदाला सर्वाधिक अधिकार

• मात्र याची नोंद निवडणूक आयोगात नसल्याचं सांगत अध्यक्षांनी 2018 ची घटनादुरुस्ती अवैध ठरवली.

घटनेतील बदल, संघटनात्मक रचना, निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार यामध्ये त्रुटी आढळल्याने विधिमंडळ अध्यक्षाने विरोधात निकाल दिल्याचं ठाकरे गटातील एका गटाचं मत आहे. पक्षाच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्यावर सोपवण्यात आली होती. त्यांच्याकडून या त्रुटी राहिल्याने पक्षाला याचा फटका बसत असल्याचं मत ठाकरे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नेत्यांनी मतं व्यक्त केल्यानंतर तातडीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीनंतर नेत्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं. दरम्यान, या चर्चा फेटाळत आमच्यात कोणतीही धुसफूस नसल्याचं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. आमच्याकडे धुसफूस नाही.कालच्या निकालानंतर अनेक जण भेटायला आलो होते. अधिवेशन नाशिकला पार पडणार त्यासाठी चर्चा झाली. नार्वेकरांनी जो निकाल लावलेला आहे.

तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी काही करता येईल का याचं नियोजन केलं. काही तारखा, वेळा निश्चित व्हायच्या आहेत ते झालं की सांगू. नार्वेकरांवर आमचा आक्षेप त्यांनी आम्हाला अपात्र करायला पाहिजे होतं. कोणाला दुखवायचे नाही, असा निकाल होता, असं त्या म्हणाल्या.

Thackeray group
Rahul Narvekar Video: शिवसेना शिंदेंची , मग ठाकरेंचे आमदारही पात्र कसे ठरले ... विधानसभा अध्यक्षांनी कोणत्या गोष्टी नमूद केल्या?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com