MLA Disqualification Result
MLA Disqualification ResultSaam Digital

MLA Disqualification Result: अपात्रता निकालानंतर शिंदेंची 'पॉवर' वाढली, ठाकरे गटाचा 'कार्यक्रम' ठरला; मातोश्रीवर मोठा प्लान

MLA Disqualification Result Update: आमदार अपात्रता निकालानंतर शिंदे सत्तेत कायम राहण्याची शक्यता वाढली असून ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. विरोधात गेलेल्या या निकालानंतर ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
Published on

MLA Disqualification Result

आमदार अपात्रता निकालानंतर शिंदे सत्तेत कायम राहण्याची शक्यता वाढली असून ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. विरोधात गेलेल्या या निकालानंतर ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल कसा अन्यायी आहे हे पटवून देण्यासाठी ठाकरे गट जनतेत जाणार आहे. यासाठी व्यहरचना केली असून मोतोश्रीवर आज यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाची मोठी बैठक पार पडली.

या बैठकीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल पोहचवण्यासाठी ठाकरे गटाकडून लवकर कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येणार असून या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यत निकाल पोहचवण्याचे ध्येय ठाकरे गट समोर ठेवणार आहे. कोर्टात लढाई सुरु असताना जनतेमध्ये जाऊन निकाल पोहचवण्याचे काम ठाकरे गटाचे नेते करणार आहेत. 26 जानेवारीपासून नेत्यांचे दौरे सुरू होणार असल्याची माहिती मिळतेय.

MLA Disqualification Result
MLA Disqualification Result: अजिबात धाकधूक नाही, मात्र 'त्या' भेटीनं संशय वाढला; NCP च्या सुनावणीवर जयंत पाटील काय म्हणाले?

शिवसेना अपात्रता सुनावणीचा निकाल काल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागला. विधिमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिंदे गटातील १६ आमदारांना पत्र ठरवलं आहे. यात अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला. हा निर्णय देताना 2018 ची घटना दुरुस्ती चुकीची असल्याचा निर्णय दिला. या निकालानंतर उद्धव ठाकरे गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची माहिती होती. मात्र या निकालाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मोतोश्रीवर बैठक बोलावण्यात आल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यांनी सांगितलं.

MLA Disqualification Result
Clean City Survey: शहर स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र नंबर १., या शहराने पटकवला पहिला क्रमांक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com