Sanjay Yenpure takes charge as Nashik IG amid major IPS reshuffle in Maharashtra. saam tv
महाराष्ट्र

राज्यात 34 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; नाशिकमध्ये 5 दिवसांत IPS अधिकाऱ्याची बदली, नवी नियुक्ती कोणाची? वाचा यादी

IPS Officer Transferred Within 5 Days In Nashik: नाशिक पोलीस परिक्षेत्रात मोठा प्रशासकीय बदल करण्यात आले आहे. संजय येनपुरे यांची IG पदावर नियुक्ती, तर प्रवीण पडवळ यांची अवघ्या 5 दिवसांत बदली करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक स्तरावर परिक्षेत्रात प्रशासकीय स्तरावर मोठे बदल पाहायला मिळत आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षकपदी संजय येनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक परिक्षेत्राच्या कारभारात आता नवे नेतृत्व येणार आहे. दरम्यान प्रवीण पडवळ यांची अवघ्या पाच दिवसांतच बदली करण्यात आली आहे. दत्तात्रय कराळे यांच्या बदलीनंतर पडवळ यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती.

मात्र, पाच दिवसातच त्यांची दादर येथील व्हीआयपी सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. येनपुरे हे सध्या व्हीआयपी सुरक्षा विभागात कार्यरत असून ते आता नाशिक परिक्षेत्रात रुजू होणार आहेत. याचबरोबर नाशिक एसपी कार्यालायतील अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अहिल्यानगर येथील राज्य राखीव बल गटाच्या समादेशक विमला एम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अवघ्या पाच दिवसांत झालेल्या या बदल्यांमुळे नाशिक पोलिस परिक्षेत्रात मोठा प्रशासकीय ट्विस्ट पाहायला मिळत असून या बदल्यांमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

कोणाची कुठे झाली नियुक्ती?

संजय येनपुरे → नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक (IG)

प्रवीण पडवळ → व्हीआयपी सुरक्षा विभाग, दादर (मुंबई)

दत्तात्रय कराळे → (पूर्वी नाशिक परिक्षेत्र IG पदावर, त्यांची आधीच बदली)

इतर महत्वाचे बदल

आदित्य मिरखेलकर → (अपर पोलिस अधीक्षक, नाशिक एसपी कार्यालय) बदली

विमला एम → अपर पोलिस अधीक्षक, नाशिक (नियुक्ती)

(पूर्वी – राज्य राखीव बल गट, अहिल्यानगर येथे समादेशक)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'चा बॉक्स ऑफिसवर धमाका, तिसऱ्या गुरुवारी १०२.७० कोटींचा टप्पा पार

NEET Paper Leak : NEET साठी विद्यार्थ्याने गमावली किडनी, आजीच्या किडनीवर झुंज सुरू; लातूरच्या पोराची हृदयद्रावक कहाणी

Friday Horoscope: आरोग्य जपा, पैशांचं योग्य नियोजन करा; वाचा आजचं राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : मार्च-एप्रिलचे ₹३००० खात्यात जमा, आता मे महिन्याचे ₹१५०० कधी? संभाव्य तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT