16 लाखांचा बोकड! कपाळावर चंद्राचं चिन्ह, सातारचा ‘स्पेशल’ बकरा चर्चेत

Goat With Moon Mark Is Expensive In India: कधी ऐकलंय 16 लाखांचा बोकड....का आहे त्याला लाखो रुपयांची मागणी? कुठला आहे हा बोकड? आणि याच्या डोक्यावर नेमकं कशाचं चिन्ह आहे? पाहूयात या नामी बोकडवरचा हा खास रिपोर्ट
A rare black goat from Satara with a moon-shaped mark on its forehead attracts offers up to ₹16 lakh ahead of Bakrid.
A rare black goat from Satara with a moon-shaped mark on its forehead attracts offers up to ₹16 lakh ahead of Bakrid.saam tv
Published On

कधी... कवा... अन् कसं कुणाचं नशीब चमकल सांगता येत नाय. सातारच्या खटाव तालुक्यातल्या डिस्कळ गावच्या एका शेतकऱ्याचं नशीब असंच झटक्यात उघडलंय. अन् ही नशीबाचं दार उडलंय एका बोकडानं. 14 महिन्याच्या या बोकडाला आलीय 16 लाखाची किंमत ... ऐकूण वासलं का नाय तोंडा..

त्याचं कारण बी खास हाय... काळ कुळकुळीत असलेल्या बोकडाच्या कपाळावर हाय चंद्र... त्यात आलीय बकरी ईद. मग स्पेशल असणारच की... चंद्र असलेल्या बोकडाला स्पेशल मागणी असती... यात बोकडाला ट्रिटमेंटबी खास. पठ्ठ्याला दिवसातून न चुकता दोन दा काजू, बदाम अन् शेंगदाणा पेंढ लागतीच... त्यात महिन्याला दोन वेळा डॉक्टरांची स्पेश विजीट असती...

सध्या बोकडाला 16 लाखाची मागणी आली असली तरी मालकाला अपेक्षा 20 लाखाची हाय... कुणी काय बी म्हणा पण ही बोकाड सध्या भाव खावून गेलंय... आता या मालकाला 16 लाख मिळत्यात का 20 लाख ही त्याच्या नशिबाचा भाग.... पण बोकडाच्या नशिबी कुर्बानीच हाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com