Cockroach Janta Party: ज्यांना झुरळ म्हटलं त्यांनीच काढला पक्ष! कॉकरोच जनता पार्टीला कोट्यवधी फॉलोअर्स; जाहीरनामा वाचून नेते-जज-अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

Cockroach Janta Party Social Media Trend: सोशल मीडियावर सध्या कॉकरोज जनता पार्टी ट्रेंड होत आहे. न्यायाधीश सुर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर त्याला विरोध म्हणून हे सोशल मीडिया हँडल सुरु करण्यात आले आहे.
Cockroach Janta Party
Cockroach Janta PartySaam Tv
Published On
Summary

सोशल मीडियावर कॉकरोज जनता पार्टी होतेय ट्रेंड

लाखो तरुणांनी केल फॉलो

कॉकरोज जनता पार्टी नेमकं आहे तरी काय?

सोशल मीडियावर सध्या कॉकरोच जनता पार्टीची जोरदार चर्चा होत आहे. सध्या सोशल मीडियावर हा विषय ट्रेंड होत असल्याचे दिसत आहे. कॉकरोज जनता पार्टी या नावाने सोशल मीडियावर अकाउंट ओपन करण्यात आले आहे. या अकाउंटला अनेकांना फॉलो केले आहे. यावरुन जोक्स, मीम्स शेअर केले जाणार आहे. काहीजण यावर टीका करतानाही दिसत आहे. दरम्यान, हे कॉकरोज जनता पार्टी आहे तरी काय, याची सुरुवात कुठून आणि कशी झाली यामागची संपूर्ण स्टोरी जाणून घ्या.

Cockroach Janta Party
Viral Video: घरात मुलगा झोपलेला, अचानक बिबट्याची एन्ट्री; आईने कठीण प्रसंगात दाखवलं धाडस, वाचवले सर्वांचे प्राण

न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी देशातील तरुणांना झुरळांची उपमान दिली. एका सुनावणीदरम्यान त्यांनी म्हटलं की, काही तरुण झुरळांसारखे आहेत. ज्यांना नोकरी नाही, कोणत्याही व्यवसायात स्थान मिळत नाही. ते सोशल मीडियावर RTI कार्यकर्ते बनून सर्वांवर टीका करतात. त्यांचे हे वक्तव्य genz म्हणजेच तरुणांना आवडलं आहे.

कोणी सुरु केली कॉकरोज जनता पार्टी? (Who Started Cockroach Janta Party)

याचविरोधात अमेरिकेतली बॉस्टन युनिव्हर्सिटीमधील अभिजित दीपके याने सोशल मीडियावर कॉकरोज जनता पार्टीची सुरुवात केली. उपहासात्मक टीका म्हणून ही पार्टी सुरु करण्यात आली आहे. कॉकरोज जनका पार्टीच्या नावाने सोशल मिडिया अकाउंट्स आणि वेबसाइट तयार करण्यात आल्या आहेत. देशातील लाखो लोकांनी या सोशल मिडिया अकाउंट्सला फॉलो केले आहे.

Cockroach Janta Party
Mumbai Viral News : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर अर्ध्यारात्री जोडप्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

पक्षाचा जाहीरनामादेखील प्रसिद्ध (What is Cockroach Janta Party)

सोशल मीडियावर कॉकरोज जनता पार्टी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये पक्षाच्या कामाबद्दल आणि तत्वांबद्दल माहिती दिली आहे.

  • कोणत्याही मूख्य न्यायमूर्तीला निवृत्तीनंतर राज्यसभेवर खासदारकी दिली जाणार नाही.

  • कोणतही वॅलिड मत हटवलं गेलं तर मुख्य निवडणूक आयोगावर कारवाई केली जाईल.

  • महिलांना ५० टक्के आरक्षण दिले जाईल. मंत्रिमंडळातदेखील ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील.

  • खोटी माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांवर कारवाई केली जाईल.

  • पक्षांतर केल्यानंतर आमदार आणि खासदारांवर २० वर्षांची निवडणूक बंदी केली जाईल.

Cockroach Janta Party
Maharashtra Politics: सांगलीत शरद पवार गटाचा करेक्ट कार्यक्रम; भाजपनं दोन शिलेदार फोडले

पक्षात येण्यासाठी खास अट

कॉकरोज जनता पार्टी पक्षात येण्यासाठी बेरोजगार असणे गरजेचे आहे. सतत ऑनलाइन राहावे लागणार, तक्रार करण्याचीही क्षमता असावी लागणार आहे. याद्वारे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जात आहे. अनेक तरुण सीबीएसई परीक्षेतील गोंधळ, नीट पेपरफुटीप्रकरण, निवडणुक प्रक्रिया याबाबत आपले मत मांडत स्पष्ट मत मांडत आहेत.

Cockroach Janta Party
BJP: भाजपच्या दिग्गज नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com