Mumbai Viral News : मुंबईतील रेल्वे स्थानकाबाहेर अर्ध्यारात्री जोडप्याचे अश्लील चाळे; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी

Couple Obscene Act Outside Churchgate Station Mumbai Viral Video: मुंबईतील चर्चगेट स्थानकाबाहेर अर्ध्या रात्री जोडप्याने सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
Couple caught engaging in inappropriate behavior on a footpath outside Churchgate station in Mumbai, sparking public outrage.
Couple caught engaging in inappropriate behavior on a footpath outside Churchgate station in Mumbai, sparking public outrage.saam tv
Published On

मायानगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कुठलीही लाज लज्जा न बाळगता एका जोडप्याने चक्क फुटपाथवरच शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Couple caught engaging in inappropriate behavior on a footpath outside Churchgate station in Mumbai, sparking public outrage.
Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

नेमकं प्रकरण काय?

आजकाल सोशल मीडियावर आणि सार्वजनिक ठिकाणी विचित्र वर्तन करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एक अस्वस्थ करणारी घटना मुंबईच्या चर्चगेट स्टेशनबाहेर घडली आहे. रात्रीच्या अंधारात हे जोडपे फुटपाथवर शारीरिक संबंध करण्यामध्ये गुंतले होते. तिथून जाणाऱ्या एका नागरिकाने हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि या जोडप्याला फटकारले.

Couple caught engaging in inappropriate behavior on a footpath outside Churchgate station in Mumbai, sparking public outrage.
Goregaon Mulund Link Road: दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी आता सुसाट जा, फ्लायओव्हर या दिवशी होणार सुरू; गोरेगाव मुलुंड लिंकरोडवर मोठी अपडेट

व्हिडिओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती या जोडप्यावर ओरडताना दिसते की, ओ भाई उघड्यावर हे काय चालले आहे? धक्कादायक म्हणजे ज्या फुटपाथवर हे जोडपे अश्लील चाळे करत होते, तेथे बाजूलाच इतर लोक झोपलेले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी इतका कडक पोलिसांचा बंदोबस्त असतो, तरी अशा घटना घडतातच कशा? असा सवाल लोक विचारात आहे. या व्हिडिओमुळे नागरिक संतप्त झाले असून या जोडप्यावर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com