Goregaon Mulund Link Road: दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी आता सुसाट जा, फ्लायओव्हर या दिवशी होणार सुरू; गोरेगाव मुलुंड लिंकरोडवर मोठी अपडेट

Goregaon Mulund Link Road Work Update: गोरेगाव-मुलुंडर लिंक रोडचे काम वेगात सुरु आहे. या रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे. मे अखेरिस हा टप्पा सुरु करण्याचे मुंबई महापालिकेचे उद्दिष्ट आहे.
Goregaon Mulund Link Road
Goregaon Mulund Link RoadSaam Tv
Published On
Summary

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे काम सुरु

पहिला टप्पा मे अखेरपर्यंत सुरु करण्याचे उद्दिष्ट

दिडोंशी कोर्ट ते फिल्म सिटी मार्ग होणार सुरु

गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे. या कामानंतर हा रस्ता सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात येईल. मे महिन्याच्या अखेरीस हा टप्पा सुरु करण्यात येईल. यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी कायमची कमी होईल.

Goregaon Mulund Link Road
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 'नो क्लिक', सेल्फी-फोटो काढणं महागात पडणार, थांबलात तर गुन्हा दाखल होणार

गोरेगाव मुलुंड लिंक रोडवर १.२ किलोमीटरचा फ्लायओव्हर तयार केला जात आहे. या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाचे काम सुरु आहे. हा मार्ग दिंडोशी कोर्ट ते गोरेगाव फिल्म सिटीपर्यंत असणार आहे. हा मार्ग पावसाळ्याआधी सुरु करण्याचे मुंबई महापालिकेचे उद्दिष्ट आहे.

कसा असणार हा मार्ग?

गोरेगाव मुलुंड लिंक रोड १२.२ किलोमीटर लांब असणार आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडण्यासाठी हा पुल तयार करण्यात आला आहे. या कॉरिडोरमध्ये अंडरग्राउंड टनल, फ्लायओव्हर आणि इंचरचेंज असणार आहे. या मार्ग सुरु झाल्यानंतर पूर्व मुंबई आणि मुंबई पश्चिम जोडली जाणा आहे. सध्या फ्लायओव्हरच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे. हा पूल दिंडोशी कोर्टापासून सुरु होणार आहे पुढे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ संपणार आहे. यामुळे मुंबई पूर्व, पश्चिम जोडले जाणार आहे. या मार्गामुळे वेस्टर्न हायवेवरील वाहतूक कोंडी खूप कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Goregaon Mulund Link Road
Link Road: नवी मुंबईत १४ किमीचा नवा लिंक रोड, एक्सप्रेसवे अन् JNP हाकेच्या अंतरावर येणार, वाचा सविस्तर

काम अंतिम टप्प्यात

सध्या या फ्लायओव्हरचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग सुरु केला जाण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईत सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड या मार्गांवरीलही वाहतूक कोंडी कमी होणार आहे. यामुळेच गोरेगाव मुलुंड लिंक रोड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२८ पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. चार टप्प्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे.

Goregaon Mulund Link Road
Missing Link Video : बाप रे! मृत्यूशी खेळ की वेडेपणा? मिसिंग लिंकच्या १८० फूट उंचीवर जीवघेणा रील; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com