Missing Link Video : बाप रे! मृत्यूशी खेळ की वेडेपणा? मिसिंग लिंकच्या १८० फूट उंचीवर जीवघेणा रील; पाहा VIDEO

Mumbai Pune expressway Missing Link viral reel news : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक प्रकल्पातील धोकादायक रील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Mumbai Pune expressway Missing Link
Mumbai Pune expressway Missing LinkSaam TV Marathi Marathi
Published On

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी

mumbai pune missing link Video : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाशी संबंधित एक रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ते पाहून तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल. ही दृश्ये पाहिल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) प्रवाशांच्या जीवाशी खेळतेय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मिसिंग लिंकवरील १८० फूट उंचीच्या पुलाचे किरकोळ काम सुरू असताना, पुलाच्या वरच्या टोकावर क्रेनमध्ये बसून एका कामगाराने हे संतापजनक रील बनवले आहे. (Mumbai Pune Expressway News)

क्रेनच्या ट्रॉलीमध्ये ४ ते ५ कामगार असून ही ट्रॉली पुलाच्या अगदी वर असल्याचे आणि खालून शेकडो वाहने धावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. असे असतानाही हा कामगार खुशाल रील बनवण्यात मग्न आहे. रील बनवताना दुर्लक्ष होऊन ही ट्रॉली थेट पुलावर कोसळली, तर किती मोठी दुर्घटना घडू शकते, या विचारानेच अंगावर थरकाप उडतो. पुलाखाली थेट खोल दरी असल्याने हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. हे सर्व सुरू असताना MSRDC आणि संबंधित कंत्राटदार कंपनी नेमकी काय करत आहे? त्यांचे याकडे लक्ष नाही का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, मिसिंग लिंकच्या या पुलावर वाहनचालक फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी थांबले, तरी त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. पुलावर वाहने थांबवणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणे असल्याने महामार्ग पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागतच झाले. मात्र, दुसरीकडे कामगारांचे असे जीवघेणे स्टंट समोर आल्यानंतर आता प्रशासन काय पावले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Mumbai Pune expressway Missing Link
मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू व्यक्तीवर ईडीचा छापा, नोटांनी भरलेल्या बॅगा सापडल्या, राजकारणात खळबळ

१०.५ किलोमीटर लांबीच्या या मिसिंग लिंक प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास झाली. प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी झाला आहे.

मिसिंग लिंकमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर ६ किलोमीटरने कमी झाले. सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बसांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. दरम्यान,महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

Mumbai Pune expressway Missing Link
West Bengal Violence : आणखी एका भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफळला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com