Viral Video: घरात मुलगा झोपलेला, अचानक बिबट्याची एन्ट्री; आईने कठीण प्रसंगात दाखवलं धाडस, वाचवले सर्वांचे प्राण

Leopard Entered House: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका 65 वर्षीय महिलेने प्रसंगावधान राखत घरात घुसलेल्या बिबट्यापासून आपल्या मुलाचा जीव वाचवला. गंगुबाई गायकवाड यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली असून त्यांच्या शौर्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
Leopard Entered House
Leopard Entered Housesaam tv
Published On

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावात एका 65 वर्षीय महिलेने दाखवलेल्या धाडसाची सध्या सगळीकडे चर्चा होतेय. गंगुबाई गायकवाड यांनी प्रसंगावधान राखत थेट घरात घुसलेल्या बिबट्यापासून आपल्या मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास गंगुबाई गायकवाड या घराच्या दरवाजाजवळील चुलीवर स्वयंपाक करत होत्या. त्याचवेळी अचानक एक बिबट्या घरात शिरला. बिबट्या अवघ्या काही फुटांच्या अंतरावरून घरात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्या वेळी त्यांचा मुलगा हरिभाऊ गायकवाड हे दरवाजालगत झोपलेले होते.

Leopard Entered House
Viral Video : धावत्या बाइकवर महिलेचे केस ओढले, ठोसे मारले; व्हायरल व्हिडिओ बघून तळपायाची आग मस्तकात जाईल

चातुर्याने हाताळली परिस्थिती

अचानक समोर बिबट्या पाहूनही गंगुबाई घाबरल्या नाहीत. त्यांनी अत्यंत शांतपणे आणि चातुर्याने प्रसंग हाताळला. त्यांनी तातडीने मुलाला बिछान्यासह बाहेर ओढले आणि क्षणाचाही विलंब न करता घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. त्यामुळे बिबट्या घरातच अडकला आणि मोठी दुर्घटना टळली.

वन विभागाने बिबट्याला केलं जेरबंद

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बराच वेळ बिबट्या घरात इकडून तिकडे उड्या मारत वन कर्मचाऱ्यांना चकवा देत होता. अखेर वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद केले.

Leopard Entered House
Viral Video: चक्रीवादळात सापडला आणि उडत गेला; हवेत उडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

या संपूर्ण घटनेत गंगुबाई गायकवाड यांनी दाखवलेले धाडस, प्रसंगावधान आणि शांतपणा पाहून त्यांचं कौतुक केलं जातं आहे. त्यांच्या धैर्यामुळे कुटुंबावर ओढवणारं मोठं संकट टळलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com