नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या प्रचार खर्चावर मर्यादा
मर्यादेपेक्षा जास्त खर्च झाल्याचे आढळल्यास उमेदवारावर कारवाई होणार.
प्रत्येक उमेदवाराने प्रचार खर्चाचे विवरण आयोगाकडे जमा करणे बंधनकारक आहे.
राज्यातील निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत नगरपरिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक प्रक्रियांची घोषणा केली. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सर्व नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये येत्या 2 डिसेंबरला मतदान होईल. तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीत ८६,८५९ सदस्यांची निवड होणार आहे. तसेच २८८ अध्यक्षांचीदेखील निवड होणार आहे. निवडणूक प्रक्रिया जाहीर करताना निवडणूक आयोगाने उमेदवारांना काही नियम घालून दिले आहेत. उमेदवारांना अर्ज ऑनलाइन करावा लागेल, तर अर्ज करताना जात प्रमाणपत्र द्यावे लागेल. निवडून आल्यानंतर उमेदवाराला ६ महिन्यात ते प्रमाणपत्र द्यावं लागले. यासह निवडणूक आयोगानं उमेदवारांना खर्चाची अट घालून दिली आहे. यासह निवडणुकीत उमेदवारांसाठी खर्चाबाबत मर्यादा ठरवून देण्यात आलीय. निवडणूक आयुक्तांनी प्रत्येक वर्गाच्या सदस्यांसाठी किती खर्च मर्यादा असेल याबाबत सविस्तर माहिती दिलीय.
अ वर्गातील नगर परिषदांच्या निवडणुकीत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे. सदस्यपदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी ५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा असेन. तर अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्यांना १५ लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल.
अ वर्गापेक्षा कमी खर्चाची मर्यादा देण्यात आलीय. ब वर्गाच्या नगर परिषदांसाठी सदस्य पदासाठी निवडणूक लढवणाऱ्यांना ३ लाख ५० हजार रुपये खर्च करता येईल. तर अध्यक्षपदाच्या उमेदवारांना ११ लाख २५ हजार रुपयांची मर्यादा आखून देण्यात आलीय.
क वर्गाच्या नगर परिषदांमध्ये अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना ७ लाख ५० हजार रुपये खर्च करता येतील. तसेच सदस्य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदारांना २ लाख ५० हजार रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आलीय.
नगरपंचायतींच्या अध्यक्ष पदासाठी ६ लाखांची खर्च मर्यादा असेन. तर सदस्य पदासाठी २ लाख २५ हजार इतकी खर्च मर्यादा आखण्यात आलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.