Nagar Parishad Nagar Panchayat Election: नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा, कशाप्रकारे होणार मतदान प्रक्रिया, काय असतील नियम?

Nagar Parishad Nagar Panchayat Election Schedule: राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. या निवडणुका प्रक्रिया कशा होतील याची माहिती आयोगानं दिलीय.
Nagar Parishad Nagar Panchayat Election Schedule
Nagar Parishad Nagar Panchayat Election Schedulesaamtv
Published On
Summary
  • २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका

  • उमेदवारांना अर्ज भरताना जात प्रमाणपत्र द्यावे लागले.

  • दुबार नोंदणी असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे.

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाने केलीय. सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेण्याचे निर्देश दिलेत, असं सांगत नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकांसंदर्भात घोषणा केली. २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. यातून ६८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्ष यांची निवड होणार आहे. तर २४६ नगरपरिषदांमध्ये १० नवीन नगरपरिषदांचा समावेश असून १५ नवीन नगरपंचायत आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगानं दिलीय.

Nagar Parishad Nagar Panchayat Election Schedule
Vote Chori: व्होटचोरीला हिंदू-मुस्लीमचा रंग; बोगस मतदारांचा फायदा नेमका कुणाला?

निवडणुकीची घोषणा करताना राज्य निवडणूक आयोगानं उमेदवार आणि मतदारांसाठी काही नियमावली सांगितलीय. राज्यात दुबार मतदार आणि मतदान याद्यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगावर टीका केली होती. विरोधकांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगानं काही सुधारणा केलीय.

Nagar Parishad Nagar Panchayat Election Schedule
Duplicate Voter Verification: निवडणुकांच्या तारखा लवकरच? दुबार मतदारांना चाप, आयोगाचे घरोघरी तपासणीचे आदेश|VIDEO

उमेदवार अर्ज कसा करणार?

उमेदवार आयोगाच्या वेबसाईटवर उमेदवारी अर्ज भरू शकतात. ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज स्विकारले जाणार आहेत.

उमेदवारांना अर्ज भरताना जात प्रमाणपत्र द्यावे लागले.

निवडून आल्यानंतर उमेदवारांना सहा महिन्यात जात प्रमाणपत्र द्यावे लागेल. नाहीतर त्यांची सदस्यता रद्द केली जाईल.

मतदारांसाठी काय असणार विशेष सुविधा

दुबार नोंदणी असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे.

मोबाईल अॅपमधून मतदार आपलं नाव शोधू शकणार

मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असणार

मतदान केंद्रावर विशेष सुविधा

मतदारांना मोबाईल अॅपद्वारे मतदान केंद्र, यादीतील नाव, उमेदवाराची माहिती मिळणार.

उमेदवारांविषयीची माहितीही अॅपच्या माध्यमातून मिळणार

तसेच दुबार मतदारांसाठी वेगळी यादी असेल. दुबार मतदारांच्या नावावर डबल स्टार असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अशी पार पडणार मतदान प्रक्रिया

१४७ नगरपंचायती आहेत, त्यातील ४२ नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे.

१३ हजार ३५५ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत मतदार याद्या अंतिम केल्या जाणार.

मतदार याद्या ७ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख - १० नोव्हेंबर २०२५

उमेदवारी अर्जसाठी अंतिम मुदत - १७ नोव्हेंबर

अर्ज छाननी - १८ नोव्हेंबर

उमेदवारी माघार घेण्याची तारीख - २१ नोव्हेंबर

मतदान कधी होणार - २ डिसेंबर

मतमोजणी - ३ डिसेंबर

निकाल कधी लागणार - १० डिसेंबर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com