

महाराष्ट्रातील व्होट चोरीच्या मुद्याला हिंदू-मुस्लीम रंग
मविआ आणि मनसे यांनी बोगस मतदारांवर मोर्चा काढला.
राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
व्होट चोरीचा मुद्दा जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी ठाकरे बंधूंनी सत्याच्या मोर्चात थेट बोगस मतदार यांद्याचा ढिगच उभा केला. मात्र त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता भाजपनंही बोगस मतदार यांद्याचाच मुद्दा मविआ आणि मनसेवर उलटवण्याची रणनीती आखलीय. राज ठाकरेंनी मलबार हिलमधील वाचून दाखवलेल्या दुबार मतदारांच्या नावांवरून भाजपनं ठाकरेंना घेरलंय. भाजपनं व्होट चोरीला थेट मराठी आणि हिंदूत्त्व जोडलंय.
एवढंच नव्हे अनेक मविआचे आमदार मुस्लीम दुबार मतदारांमुळेच विजयी झाल्याचा दावा आशिष शेलारांनी केलाय. त्यांनी मविआच्या काही आमदारांची यादीच वाचून दाखवलीय. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवाराच्या विजयाचं मताधिक्य 1243 इतकं होतं. तर मुस्लिम दुबार मतदार 5 हजार 532 होते. तर साकोलीत नाना पटोलेंच्या विजयाचं मताधिक्य 208 असून मुस्लिम दुबार मतदार 477 होते. वांद्र पूर्वमध्ये वरून सरदेसाईंचं मताधिक्य 11 हजार 365 असून मुस्लिम दुबार मतदार 13 हजार 313 होते. मालाड पश्चिममध्ये अस्लम शेख यांच्या विजयाचं मताधिक्य 17,007 असून मुस्लीम दुबार मतदार 6,227 होते. बीडमध्ये संदीप क्षीरसागर याच्या विजयाचं मताधिक्य 5 हजार 324 असून मुस्लिम दुबार मतदार 14 हजार 944 होते.
आशिष शेलारांनी ठाकरे बंधूंना व्होट जिहादचा समर्थन करू नका, विचारवापसी करा, असा खोचक सल्लाही दिलाय...तर हिंदू-मुस्लीमाचा वाद निर्माण करून लोकशाही कमजोर करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतायत, असा टोला पटोलेंनी लगावलाय. लोकसभेत राज्यातल्या पराभवनानंतर भाजपनं व्होट जिहादचा मुद्दा तापवला होता....तर विधानसभेतल्या पराभवानंतर मविआ आणि मनसेनं व्होट चोरीचा मुद्या तापवत बोगस मतदारांवरून रान उठवलंय. मात्र स्थानिक स्वराज्य़ संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शह-काटशहाच्या राजकारणात बोगस मतदारांचा मुद्दा थेट आता जात आणि धर्मापर्यंत पोहचलाय. याचा फायदा नेमका कुणाला होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.