

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NCDC मधून दीडशे कोटींची मदत दिली.
साखर उद्योग ग्रीन हायड्रोजनच्या दिशेने पुढे जात आहे.
जगाला इथेनॉल आणि शुगर पुरवणारा देश म्हणून भारताचे नाव
मंगेश कचरे, साम प्रतिनिधी
हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडण्यामागील कारण म्हणजे पाटलांनी केलेले सीएम, पीएमचं कौतुक. येत्या काही दिवसात शरद पवार गट राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील पुन्हा आपलं पारडं बदलण्याच्या बेतात आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. जर हर्षवर्धन पाटील पक्ष बदलाच्या तयारीत असतील हा शरद पवार यांच्यासाठी बारामतीमधील इंदापूरमध्ये मोठा धक्का मानला जाईल.
इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या तिन्ही प्रमुख नेत्यांचे म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासाठी घेतलेल्या निर्णयांमुळे उद्योग नव्या उंचीवर पोहोचत आहे.
इथेनॉल धोरण, इन्कम टॅक्स माफी आणि बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून साखर उद्योग ग्रीन हायड्रोजनच्या दिशेने पुढे जात आहे. जगाला इथेनॉल आणि शुगर पुरवणारा देश म्हणून भारताचे नाव अभिमानाने घेतले जाते. गेल्या वेळी आमचा कारखाना अडचणीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी NCDC मधून दीडशे कोटींची मदत दिली, असे त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील यांनी केलेल्या या कौतुकामुळे ते पुन्हा भाजपकडे वळत आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे. त्यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोगी तत्वावर चालवण्यासाठी दिलेल्या ओंकार शुगर फॅक्टरीच्या 36 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
भरकार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केलंय. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, अशा चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार गटातील प्रवेशामुळे महायुतीचं टेन्शन वाढलं होतं. २०१९ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकताना हर्षवर्धन पाटलांनी राष्ट्रवादी किंबहुना पवार कुटुंबावर आरोप केले होते. त्यानंतर पाच वर्षात त्याच पवार कुटुंबाचं गुणगान गात हर्षवर्धन 'तुतारी' फुंकली. आता हर्षवर्धन पाटील भाजप नेत्यांचे कौतुक करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.