देशात आणि राज्यात सध्या पप्पूवरुन राजकारण पेटलंय. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पप्पू ठरवण्यावरून स्पर्धा लागलीय. याची सुरूवात झाली ती 2019 मध्ये मोदी लाटेत काँग्रेसचा सुपडासाफ झाल्यानंतर भाजपनं काँग्रेस नेते राहूल गांधींना हिणवण्यानं..
यानंतर राहूल गांधींनी आपली प्रतिमा बदलण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. मात्र भाजपला जेव्हा संधी मिळते तेव्हा ते राहुल गांधींना पप्पू ठरवण्याचा प्रयत्न करतात...आणि हेच पप्पू प्रकरण आता महाराष्ट्राच्या राजकारणात शिरलंय....त्याला कारण ठरलंय.....व्होट चोरीचा मुद्दा....राहुल गांधींनी व्होट चोरीच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपला घेरलं...तोच धागा पुढे नेत आदित्य ठाकरेंनीही त्यांच्यासारखंच जाहीररित्या प्रेझेन्टेशन करून राज्यातल्या व्होट चोरीचा मुद्दा तापवला....
मात्र त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदित्या ठाकरेंना महाराष्ट्राचा पप्पू ठरवलं...फडणवीस आदित्य ठाकरेंबाबत नेमके काय म्हटले होते ते पाहूयात....तर व्होट चोरीच्या मुद्यावर विरोधकांनी सत्ताधाऱी आणि निवडणूक आयोगाला सातत्यानं लक्ष्य केलं. फडणवीसांनी मात्र फेक नॅरेटीव्ह म्हणून हे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर भाजपनंही दुबार मतदारांचा मुद्दा मान्य करत मविआलाच कसा फायदा झाला हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.
त्यातूनच शेलरांनी फडणवीसांना पप्पू ठरवल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली..यानिमित्तानं शेलार-फडणवीसांमधील वादातूनच हे बाहेर आल्याचा टोलाही त्यांनी लगावला. पॉलिटिक्समध्ये पप्पू या शब्दाचा उपहासात्मक वापर हा राहुल गांधींपासून सुरु झाला. आणि तो तो आता राज्यातल्या राजकारणात आदित्य ठाकरे, देवेंद्र फडणवीसांपर्यंत येऊन पोहचलाय. राजकारणात नेते एकमेकांवर पप्पू आणि गप्पूची टीका करतच राहतील...मात्र व्होट चोरीच्या मुद्यामुळे आगामी निवडणुकीत जनतेचाच प्पू तर होणार नाही ना ? हा खरा सवाल आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.