Maharashtra Municipal Corporation Elections 
महाराष्ट्र

Corporation Election : कार्यकर्त्यांनो लागा तयारीला! मुंबई-पुण्यासह राज्यातील महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

Maharashtra Municipal Corporation Elections ; २२ ऑगस्ट २०२५ पासून राज्यातील महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना नोंदवता येतील. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आदींचा समावेश आहे. हरकतींवर सुनावणी होऊन १५ सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सादर केली जाणार.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • राज्यातील महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

  • मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार आदींचा समावेश

  • नागरिकांना ४ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येणार

  • सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये जाहीर होणार

Draft ward structure for Maharashtra municipal corporations 2025 : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. राज्यातील मनपाकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यात गणेशोत्सावानंतर लवकरच प्रचाराचा धुरळा उडणार हे निश्चित झाले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, पिंपर चिंचवड, नागपूरसह राज्यातील सर्वच महत्त्वाच्या महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांना या प्रारूप रचनेवर हरकती आणि सूचना मांडण्याची संधी मिळेल. 4 सप्टेंबर पर्यंत सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणार आहेत. त्यानंतर 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडेल. सुनावणी पार पडल्यावर पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत पालिका आयुक्त नगरविकास विभागाकडे अंतिम प्रभाग रचना सादर करतील.

मुंबईसह अ ब क वर्गातील अनेक महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि नाशिक या महापालिकांचाही समावेश आहे. प्रारूप प्रभाग रचना ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पहिली पायरी मानली जाते. मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आले आहेत. सागरी किनारा मार्ग, अटल सेतू आणि मेट्रोच्या बांधकामांचा प्रभाग रचनेत समावेश करण्यात आलाय. नवी मुंबईत १११ नगरसेवकांसाठी २८ प्रभाग, कल्याण-डोंबिवलीत १२२ जागांसाठी ३१ प्रभाग ठेवण्यात आले आहेत. पुण्यात ४१ प्रभाग असून, त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय ठेवला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ३२ प्रभाग आणि नाशिकमध्ये ३१ प्रभाग जाहीर झाले आहेत.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका -

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा शुक्रवारी जाहीर झाला. १२२ सदस्य निवडीसाठी चार सदस्यांचे २९ पॅनल तर तीन सदस्यांचे दोन पॅनल असे ३२ पॅनल मधून १२२ प्रभागासाठी निवडणूक होणार आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची मुदत २०२० मध्ये संपली असून कोरोनामुळे निवडणुका होऊ न शकल्यानं गेल्या ५ वर्षांपासून पालिकेवर आजमिती पर्यंत प्रशासकीय राजवट आहे.

यंदाची आगामी पालिका निवडणुका प्रथमच बहु सदस्यीय पॅनल पद्धतीने घेतली जाणार असून चार प्रभागाचा एक पॅनल असल्याने सर्वच राजकीय पक्षा सह इच्यूक उमेदवारांना प्रभागाची रचना कशी असणार असून कोणकोणते चार प्रभाग एकमेकाना जोडून पॅनल तयार केला आहे. पालिकेतील १२२ प्रभागा करिता १२२ सदस्य निवडीसाठी बहु सदस्यीय पद्धतीने म्हणजेच चार सदस्यीय प्रभाग पॅनल पद्धतीने ३२ पॅनल ची निवडणूक घेण्यात येणार आहे. यामध्ये चार सदस्यांचे २९ पॅनल तर तीन सदस्यांचे दोन पॅनल असे ३२ पॅनल मधून १२२ प्रभागासाठी १२२ सदस्य निवडी साठी निवडणूक होणार आहे .या रचनेवर ४ सप्टेंबर २०२५ पर्यंत पालिका आयुक्तांकडे नगरपालिकेत हरकती आणि सूचना नोंदवता येणार असून त्यावर सुनावणी होऊन त्यानंतर अंतिम आराखडा जाहीर होण्याची शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीला वेग आला, अखेर प्रारुप प्रभाग रचना जाहीर

-पिंपरी चिंचवड महापालिकेने आज शहरातील 32 प्रभागांची रचना जाहीर केली. चार सदस्यांचा एक प्रभाग असल्यानं एकूण 128 जागांसाठी ही प्रारुप प्रभाग रचना आहे. 16 ते 22 सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडे ही प्रभाग रचना सादर होईल. मग राज्य निवडणूक आयोग या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देतील. त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोंबरच्या दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेच्या आधारावर महापालिका निवडणूक पार पडेल.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप आराखडा जाहीर

आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभाग असणार...यात ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या २०११ जनगणनेनुसार ३४,८१,३५९ इतकी असुन अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,६८,६३३ इतकी आहे, व अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४०,६८७ इतकी आहे. तसेच निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या १६५ आहे.

नाशिक महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकांसाठी ४ सदस्यीय प्रारुप प्रभागरचना जाहीर झाली. २०११ च्या लोकसंख्येनुसार १२२ सदस्य संख्या कायम राहिली असून ४ सदस्यीय प्रभाग पद्धत आणि प्रभागरचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल न झाल्याने २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना ‘जैसे थे’ राहिलीय. मागील प्रभागरचनेप्रमाणेच ४ सदस्यीय २९ तर प्रभाग क्र.१५ आणि १९ हे ३ सदस्यीय दोन प्रभाग राहणार आहेत. दरम्यान राज्य शासनाने जारी केलेल्या सुधारीत कार्यक्रमानुसार या प्रभागरचनेवर ४ सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मांडता येणार आहेत.

वसई-विरार पालिकेचा प्रारूप आराखडा जाहीर

वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय. २२ ऑगस्ट रोजी वसई-विरार पालिकेचा प्रभागरचना प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला. वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीसाठी २९ प्रभागांची रचना करण्यात आली. २८ प्रभागांत चार नगरसेवक तर २९व्या प्रभागात तीन अशाप्रकारे २९ प्रभागांत ११५ नगरसेवकांसाठी वसई-विरार महापालिकेची निवडणूक होणार आहे.

नागपूर मनपा प्रारूप प्रभाग रचना

नागपूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली. नव्या प्रारूप रचनेनुसार नागपुरात ३८ प्रभाग असतील. ही प्रभाग रचना २०१७ च्या धर्तीवर चार सदस्यीय असणार आहे... या प्रारूप आराखड्यावर हरकती आणि सूचना २३ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ (दुपारी ३ वाजता) पर्यंत करता येतील. हरकती आणि सूचना मनपाचा निवडणूक विभाग, तसेच झोन कार्यालयाकडे सादर करता येतील. सुनावणीकरिता हजर राहण्यासंदर्भात हरकती नोंदवता येणार आहे..

एका प्रभागात ६० ते ६५ हजार मतदार असणार आहे. २०१७ च्या निवडणुकीवेळी शहरातील मतदारांची संख्या २३.८३ लाख होती. यात मोठी वाढ झाली आहे. १ जुलै २०२५ पर्यंत शहरातील नोंदणीकृत मतदारसंख्या २४.८४ लाखांवर पोहोचली आहे. तर प्रत्येक प्रभागात सरासरी ६० ते ६५ हजार मतदार राहणार आहे. मात्र काही प्रभागात याहून अधिक तर काही प्रभागात कमी राहण्याची शक्यता आहे. शहरात १५१ नगरसेवक राहतील, ३७ प्रभागांतून प्रत्येकी चार नगरसेवक निवडले जातील, तर एका प्रभागातून तीन नगरसेवकांची निवड होईल. अशाप्रकारे ३८ प्रभागातून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या १५१ होईल.

यवतमाळ अंतिम प्रभाग रचनेवर मंजुरीची मोहोर

यवतमाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अंतिम प्रभाग रचनेवर अखेर अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या मंजुरीची मोहोर उमटली. त्यानंतर तहसील स्तरावर 62 गट आणि 124 गणाची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचालींना आणखी वेग येणार आहे.

लातूर जिल्हा परिषद निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर, इच्छुकांचे आरक्षणाकडे डोळे

मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. या प्रभाग रचनेत निलंगा तालुक्यात एक गट आणि पंचायत समितीचे दोन गट वाढले आहेत. त्यामुळे आता इच्छुकांचे डोळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आरक्षणाकडे लागली आहे. तर गुडघ्याला बाशिंग बांधून आलेल्या स्थानिक पुढाऱ्यांच्या गाठीभेटी देखील आता वाढणार आहेत. तर लातूर जिल्हा परिषदेत पूर्वी 58 गट होते, मात्र यात आता निलंगा तालुक्यातील दापका गट वाढल्याने ते 59 झाले आहे, तर पंचायत समिती गण हे पूर्वी 116 होते, त्यात वाढ होऊन 118 गण अशी निश्चित प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन 2025 मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मा.राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार प्रारूप प्रभागांच्या भौगोलिक सीमांची अधिसूचना दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या भौगोलिक सीमांचे प्रारूप प्रभागनिहाय नकाशे नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ येथे मुख्यपृष्ठावर प्रसिध्द करण्यात आलेले आहेत तसेच त्यावर हरकती व सूचना मागविण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Retirement : विराट कोहली IPLमधूनही 'रिटायर' होणार, सहकाऱ्याच्या दाव्यानं भुवया उंचावल्या

Mega Block : मध्य-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कसा कराल प्रवास? कोणत्या लोकल रद्द? वाचा वेळापत्रक

Govinda Sunita Divorce: गोविंदा-सुनिताच्या घटस्फोटाच्या चर्चा, मोठ्या लेकीच्या मनात नेमकं काय? स्वतःच सर्वकाही सांगितलं

मराठी अभिनेत्रीमुळे गोविंदाचा संसार मोडणार? घटस्फोट घेण्यामागचं कारण काय? सुनीता म्हणाली..

Shatataraka Nakshatra : कुंभ राशीचे रहस्य; शततारका नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

SCROLL FOR NEXT