LPG टँकरचा स्फोट, २ जणांचा मृत्यू, १०० जण होरपळले, गावात हाहाकार, भयावह व्हिडिओ व्हायरल

पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यात एलपीजी टँकरला ट्रकने जोरात धडक दिल्याने भीषण स्फोट झाला. दोन जणांचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. टँकर पलटी झाल्यानंतर गॅस अख्ख्या गावात पसरला आणि आग वाऱ्यासारखी पसरली.
LPG टँकरचा स्फोट, २ जणांचा मृत्यू, १०० जण होरपळले, गावात हाहाकार, भयावह व्हिडिओ व्हायरल
Published On
Summary
  • होशियारपूरमध्ये एलपीजी टँकरचा भीषण स्फोट

  • दोन जणांचा मृत्यू, १०० जण गंभीर जखमी

  • गावभर आग पसरून एकच हाहाकार

  • महामार्ग बंद, अग्निशामन दलाने आगीवर नियंत्रण

पंजाबमधील होशियापूरमध्ये एलपीजी टँकरचा ब्लास्ट झाला अन् एकच हाहाकार उडाला. या धक्कादायक घटनेत दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा अधिकजण होरपळले आहेत. अनेक दुकानाला आगही लागली आहे. आग इतकी भयंकर होती की गावातील दुकानातही पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, एलपीजी टँकरला एका ट्रकने जोरात धडक दिल्यामुळे स्फोट झाला अन् एकच हाहाकार उडाला. या दुर्घटनेत १०० जण होरपळले आहेत, त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री ११ वाजता ही दुर्घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ होशियारपूर-जालधर राष्ट्रीय महामार्ग बंद केला आहे. पोलिसांनी तात्काळ अग्निशामन दलाला पाचारण करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केला. आज पहाटेपर्यंत आग धगधगत होती. सकाळी आगीवर नियंत्रण मिळवले अशून कुलिंगचे काम सुरू आहे.

होशियारपुर-जालंधर राष्ट्रीय महामार्गवरील मंडियाला गावाजवळ शुक्रवारी रात्री ११ वाजता ट्रकने एलपीजी टँकरला जोरात धडक दिली. एलपीजीने भरलेला टँकर त्यामुळे पटली झाला. टँकरमधील गॅस अख्ख्या गावात पसरला अन् आग भडकली. गावात सगळीकडे एकच खळबळ आणि धावपळ उडाली होती. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहे. दुर्घटना घडली, त्याठिकाणाहून फक्त ५०० मीटरच्या अंतरावर गॅस प्लांट आहे. पण सुदैवाने आग गॅस प्लँटकडे गेली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

मंडियाला गावातील दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग सर्वात आधी बंद केला. त्यानंतर अग्निशामन दलाच्या पथकाला पाचारण केले. पाण्याचे बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. गावातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. जखमी झालेल्यांना तात्काळ रूग्णलयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. जवळच्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गावातील प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, एलपीजी टँकरचा स्फोट इतका भयंकर होता की गावात बॉम्बस्फोट झाल्याचे वाटले. पण काही वेळानंतर समजले की एलपीजी टँकरचा स्फोट झाला आहे.

LPG टँकरचा स्फोट, २ जणांचा मृत्यू, १०० जण होरपळले, गावात हाहाकार, भयावह व्हिडिओ व्हायरल
Supreme Court: भटक्या कुत्र्यांबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलला, शेल्टर होम नाही, नसबंदीवर भर

सगळ्या गावात लागली आग -

एलपीजी गँस टँकरचा स्फोट झाल्यानंतर आग वाऱ्यासारखी पसरली. गॅस सगळ्या गावात पसरला होता, त्यामुळे आगही झपाट्याने परसली. सगळ्या गावात आगीने हाहाकार माजवला होता. गावातील लोक घाबरून सैरावैरा पळत होता, त्यांना काय झालेय, हे समजण्यास उशीर लागला. तोपर्यंत १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. पोलिसांनी तात्काळ दुर्घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.

LPG टँकरचा स्फोट, २ जणांचा मृत्यू, १०० जण होरपळले, गावात हाहाकार, भयावह व्हिडिओ व्हायरल
पुण्याचा पॅटर्न अकोल्यात, पोलिसांनी गावगुंडाची काढली धिंड, दिला कडक इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com