Supreme Court: भटक्या कुत्र्यांबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलला, शेल्टर होम नाही, नसबंदीवर भर

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने शेल्टर होमऐवजी नसबंदी आणि लसीकरण हाच योग्य उपाय असल्याचे सांगितले. केवळ हिंसक किंवा रेबीजसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त कुत्र्यांनाच शेल्टर होममध्ये ठेवता येईल.
Supreme Court Decision
Supreme Court Saam Tv
Published On
Summary
  • सर्वोच्च न्यायालयाने शेल्टर होमऐवजी नसबंदीला प्राधान्य दिलं.

  • सर्व कुत्र्यांचं लसीकरण व नसबंदी केल्यानंतर त्यांना सोडावं.

  • फक्त हिंसक किंवा रेबीजग्रस्त कुत्र्यांनाच शेल्टरमध्ये ठेवण्याचा आदेश.

  • सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाद्य देण्यास बंदी आणि कठोर कायद्याची गरज व्यक्त.

भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय म्हणून शेल्टर होमऐवजी नसबंदी हाच योग्य पर्याय असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज जाहीर केला. दिल्ली-एनसीआर परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये शेल्टर होममधील कुत्रांना सोडण्याचे निर्देश कोर्टाने दिले. शेल्टर होममधील सर्व कुत्र्यांना नसबंदी आणि लसीकरणानंतर मोकळे सोडावे. केवळ हिंसक किंवा रेबीजसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त कुत्र्यांनाच शेल्टर होममध्ये ठेवण्यात यावे, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी भटक्या कुत्र्यांना खाद्य देण्यास मनाई केली असून, यासंदर्भात कठोर कायद्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या निर्णयामुळे भटक्या कुत्र्यांमुळे निर्माण होणाऱ्या सार्वजनिक सुरक्षा आणि आरोग्याच्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन दिशा मिळेल. न्यायालयाने यापूर्वीच्या आदेशात सुधारणा करताना म्हटले की, सर्वसामान्य कुत्र्यांना शेल्टर होममध्ये डांबणे हा व्यवहार्य उपाय नाही. त्याऐवजी, नसबंदी आणि लसीकरणाद्वारे त्यांची लोकसंख्या नियंत्रित करणे अधिक प्रभावी ठरेल.

Supreme Court Decision
Ganpati Special Train : गणपती बाप्पा मोरया! गणेशोत्सवासाठी ३८० विशेष ट्रेन्स धावणार

हा निर्णय दिल्ली-एनसीआरमधील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तात्पुरता दिलासा देणारा ठरू शकतो. यापूर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सर्व भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याची सूचना होती. परंतु आजच्या निर्णयाने त्यात बदल करत नसबंदीला प्राधान्य देण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्राणी कल्याण संघटना आणि स्थानिक प्रशासन यांच्यातील समन्वयाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

Supreme Court Decision
ST employees salary : एसटी कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला, या महिन्याचा पगार आधीच होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com