
गणेशोत्सवाआधी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार जमा होणार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वित्त मंत्रालयाकडे फाईल सादर करण्याचे आदेश दिले
सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार
राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनाही पगार आगाऊ मिळणार
ST Employees to Get August Salary in Advance Before Ganesh Festival : एसटी कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला आहे, कारण गणेशोत्सवामुळे ऑगस्ट महिन्याचा पगार गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात पावले उचलली आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पगार लवकर देण्यासाठी सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या फाईल वित्त मंत्रालयाकडे सादर करण्याचे आदेश परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. चार ते पाच दिवस आधीच एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होऊ शकतो, असे सांगितले जातेय. (Pratap Sarnaik Orders Early Salary Credit for Maharashtra ST Staff)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचे पगार सोमवार किंवा मंगळवारी जमा होणार आहेत. परिवहन मंत्रालयाने सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणार आहे. याशिवाय, राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगारही गणेशोत्सवापूर्वी जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल. यासोबतच, प्रवाशांना सणाच्या काळात निर्बाध बससेवा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळण्यात अडथळे येत होते. त्यामुळे त्यांच्यात असंतोष वाढत होता. विशेषतः सणासुदीच्या काळात खर्च वाढल्याने कर्मचारी सातत्याने वेळेवर पगाराची मागणी करत आहेत. यावर उपाय म्हणून, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गणपती सणापूर्वीच पुढील महिन्याचा पगार देण्याचे निर्देश दिले आहेत, ज्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस.टी. कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.