गंगा स्नानाला जाताना काळाचा घाला, ट्रकने ऑटोला चिरडले, ८ जणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

Bihar Accident : पटन्यातील अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सात महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. गंगा स्नानासाठी जाणाऱ्या ऑटोला ट्रकने जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.
Patna accident:
Patna accident: Truck-auto collision leaves 8 dead, 5 injured; victims were on way to Ganga snan.
Published On
Summary
  • पटन्यात ऑटो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला.

  • अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, मृतांमध्ये ७ महिला.

  • ५ जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

  • ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला, पोलिस तपास सुरू आहे.

Patna Road Accident: बिहारमधील पटनामध्ये शनिवारी सकाळी ऑटो आणि ट्रकचा भयंकर अपघात जाला आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतामध्ये सात महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ऑटोमधील सर्वजण गंगा स्नान करण्यासाठी निघाले होते, त्यावेळी काळाने घाला घातला. एका ट्रकने ऑटोला जोरात धडक दिली. अपघात इतका भयंकर होता की ऑटोचा चुराडा झाला आहे.

अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक कोंडी सुरळीत केली. त्याशिवाय जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केला. पोलिसांनी आठ मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

Patna accident:
पुणे मनपावरून महायुतीत महाभारत पेटणार? नव्या प्रभाग रचनेचा राष्ट्रवादीला फटका, शिवसेना-भाजपला फायदा

पटनामधील शाहजहांपूर येथे ऑटो आणि ट्रकचा हा भयंकर अपघात झाला. ग्रामीण एसपीने अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सांगितले की, या भयंकर अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर आहे. ऑटोमधील सर्वजण गंगा स्नान करण्यासाठी नालंदा फतुहाकडे जात होते. त्यावेळी काळाने घाला घातला. अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Patna accident:
चाकरमानी' नव्हे तर 'कोकणवासीय'! संबोधनात लवकर बदल, Ajit Pawar यांचे निर्देश

स्थानिकांनी अपघाताबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेतला जात आहे. या अपघात पाच जण जखमी झाले आहेत, त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येतेय. त्यांना दुसऱ्या रूग्णालयात उपचारासाठी शिफ्ट करण्यात आले आहे.

Patna accident:
कोल्हापूरमध्ये रात्री दंगल; जाळपोळ, दगडफेक अन् गाड्यांची तोडफोड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com