पुणे मनपावरून महायुतीत महाभारत पेटणार? नव्या प्रभाग रचनेचा राष्ट्रवादीला फटका, शिवसेना-भाजपला फायदा

BJP Shiv Sena advantage in Pune civic polls : पुणे महापालिकेसाठी एकूण ४१ प्रभाग जाहीर झाले असून त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय आणि एक प्रभाग पाच सदस्यीय आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला फटका बसणार असून भाजप-शिवसेनेला फायदा होणार आहे.
pune-municipal-election-ward-structure-2025
pune-municipal-election-ward-structure-2025Saam TV News Marathi
Published On
Summary
  • पुणे महापालिकेसाठी नव्या प्रभाग रचनेत ४१ प्रभाग जाहीर.

  • ४० प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग पाच सदस्यीय.

  • भाजप-शिवसेनेला फायदा, राष्ट्रवादीला फटका बसणार.

  • महायुतित शीतयुद्ध पेटण्याची चिन्हं.

Pune municipal corporation election 2025 new ward structure details : पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर कऱण्यात आलीय. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभागरचनेत मोठे बदल कऱण्यात आलेले नाहीत. उपनगरात मात्र फेरबदल करण्यात आलेत...या प्रभागरचनेचा भाजप आणि शिंदेसेनेला फायदा होणार आहे..दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याचे वर्चस्व असलेल्या प्रभागात बदल केल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. करावा, पर्वती, कोथरूड, शिवाजीनगर या मध्यवतीं भागातील विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांची संख्या कमी होणार नाही, याची काळजी घेण्यात आलीय...दुसरीकडे उपनगरांतील प्रभाग मोठे केल्यानं नगरसेवकांची संख्या वाढण्यावर मर्यादा आलीय. त्याचाच फटका अजितदादांच्या राष्ट्रवादीला बसणार आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकूण 41 प्रभाग असणार...यात ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय आहे. एकूण ४१ प्रभागांपैकी प्रभाग क्र. ३८ हा ५ सदस्यीय असून उर्वरित ४० प्रभाग ४ सदस्यीय आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्राची एकूण लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३४,८१,३५९ इतकी असून अनुसूचित जातीची लोकसंख्या ४,६८,६३३ इतकी आहे, व अनु सूचित जमातीची लोकसंख्या ४०,६८७ इतकी आहे. तसेच निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या १६५ आहे.

pune-municipal-election-ward-structure-2025
निवडणुकीचे बिगुल वाजले, पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, वाचा

पुणे महानगरपालिकेने प्रभाग रचना नगर रचना विभागाला पाठवली होती. यामध्ये महानगरपालिकेने तीन प्रभाग तीन सदस्य प्रस्ताव पाठवला होता. प्रस्ताव नगर रचना विभागाला गेल्यानंतर तीन सदस्य प्रभाग न ठेवता पाच सदस्य एकच प्रभाग केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या प्रभाग रचनेवरून शीत युद्ध पेटणार हे मात्र निश्चित.

pune-municipal-election-ward-structure-2025
LPG टँकरचा स्फोट, २ जणांचा मृत्यू, १०० जण होरपळले, गावात हाहाकार, भयावह व्हिडिओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com