निवडणुकीचे बिगुल वाजले, पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना जाहीर, वाचा

पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. ३२ प्रभागांमध्ये १२८ जागांसाठी ही रचना आहे. ४ सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. अंतिम रचना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहे.

impri Chinchwad Municipal Corporation पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीला वेग आला आला आहे. प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेने आज शहरातील 32 प्रभागांची रचना जाहीर केलीये. चार सदस्यांचा एक प्रभाग असल्यानं एकूण 128 जागांसाठी ही प्रारुप प्रभाग रचना आहे. यावर 4 सप्टेंबर पर्यंत सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणार आहेत. त्यानंतर 5 ते 12 सप्टेंबर दरम्यान नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडेल. सुनावणी पार पडल्यावर पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत पालिका आयुक्त नगरविकास विभागाकडे अंतिम प्रभाग रचना सादर करतील.

तिथून पुढं 16 ते 22 सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडे ही प्रभाग रचना सादर होईल. मग राज्य निवडणूक आयोग या प्रभाग रचनेला अंतिम मान्यता देतील. त्यानंतर 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोंबरच्या दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील. त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या प्रभाग रचनेच्या आधारावर महापालिका निवडणूक पार पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com