Maharashtra Monsoon Rain Update Yandex
महाराष्ट्र

Maharashtra Weather: पुढील ४८ तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; ५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

5 District in Maharashtra Are on Yellow Alret Due To Rain: काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रीय झाला असून पुढील ४८ तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. तर आज कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार यांचा अंदाज जाणून घेऊ.

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

मॉन्सून दाखल झाल्यानंतर राज्यात पावसाने दडी मारली असली, तरी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. राज्यातील अनेक भागाला जोरदार पावसाची प्रतीक्षा असताना हवामान आनंदाची बातमी दिलीय. पुढील ४८ तासात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल, अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.

आज दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून हवामान विभागाने येथे ऑरेंज अलर्ट दिलाय. उर्वरित कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होईल. विदर्भ, मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. महाराष्ट्रातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रीय असून पुढील ४८ तासात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलीय.

अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणावर बाष्प जमा होत असून कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या दृष्टीने पोषक हवामान तयार होतय. मॉन्सून सक्रिय झाल्याने दोन दिवसात राज्यात मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज आहे. मध्य गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालाय.

पावसाळा सुरु होताच शेती कामाला वेग आला आहे. पावसाळा लागताच शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. शेती मशागती, परे टाकन्याचा कामाला वेग आला असून यंदा चांगला पाऊस पडून उत्पादन भर पडावी, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कारची दुचाकीला धडक, मोटारसायकल स्वारला लांबपर्यंत नेलं फरफटत, दिवेआगरमधील घटना

Night Good Habits: रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 गोष्टी करा, सकाळी उठल्यावर मूड होईल फ्रेश

मोठी बातमी! मिरा-भाईंदरमध्ये भाजपने बसवला गुजराती महापौर

Truck Accident: भीषण अपघात; शंभरच्या स्पीडनं धावणाऱ्या ट्रकच्या धडकेत २ रिक्षांचा चक्काचूर, ५ जणांचा जागीच मृत्यू

शिक्षकांची परीक्षा; इलेक्शन ड्युटी होणार रद्द

SCROLL FOR NEXT