दोन दिवसांत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

पावसामुळे ठिकाणी मुळासकट झाडे ऊन्मळून पडली आहे. तसेच घरांचीही पडझड झाली आहे.दरम्यान, महाराष्ट्रात पुढील काही दोन-तीन दिवसांसाठी हवामानाचा तीव्र इशारा देण्यात आला आहे.
Rain
Rain Saam Tv
Published On

पुणे : केरळमध्ये मॉन्सूनचे (Monsoon) आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात लवकरच पाऊस बरसणार असण्याची माहिती हवामान खात्याने दिली होती. काही दिवसांपूर्वीच राज्यात काही जिल्ह्यांमध्ये वेळेआधी पाऊस बरसला आहे.साताऱ्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा (Rain) तडाखा बसला आहे. तर काही ठिकाणी मुळासकट झाडे ऊन्मळून पडली आहे. तसेच घरांचीही पडझड झाली आहे.दरम्यान, महाराष्ट्रात पुढील काही दोन-तीन दिवसांसाठी हवामानाचा तीव्र इशारा देण्यात आला आहे. ( monsoon latest update )

हे देखील पाहा -

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार-पाच दिवसात महाराष्ट्रात अंतर्गत भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातही काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.विदर्भ सोडून राज्यातील इतरही काही भाग जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात पावसासोबत सोसाट्याचा वारादेखील वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील काही भागांतही जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच राज्यातील किनारपट्टीवरील नागरिकांना सावधही राहण्यास सांगितले आहे. राज्यात अनेक शेतकरी पावसाच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांना पावसाकडून लवकरच दिलासा मिळणार आहे.

Rain
भंडाऱ्यात सूर्याचा प्रकोप सुरुच..सलग पाच दिवसांपासून तापमान 45 अंशावर

दरम्यान, केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन २९ मे रोजी झाले आहे. त्यात ईशान्य भारत, कर्नाटक, केरळमध्ये (Keral) मॉन्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मॉन्सून ३ रोजी दाखल होईल असा अंदाज होता. आता हवामान खात्याचा नव्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ८ जून रोजी मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात ८ जून रोजी पावसाची शक्यता आहे. तसेच ९,१०,११ रोजी सर्वत्र पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेदशाळेने वर्तवला आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com