Maharashtra Farmer Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Farmer: मोठी बातमी! कर्जमाफी कधीपासून होणार, कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

Loan Waiver: महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी कधी होणार याची वाट पाहत आहेत. कर्जमाफीबाबत आता राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी महत्वाची अपडेट दिली. त्यांनी कर्जमाफीची तारीख सांगून टाकली. काय म्हणाले वाचा...

Priya More

Summary -

  • कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर आली

  • कृषीमंत्र्यांनी कर्जमाफी कधीपासून होणार याची तारीख सांगितली

  • ३० जूनपर्यंत सुरू होणार कर्जमाफी

  • परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळणार

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कर्जमाफीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी कर्जमाफी कधीपासून होणार याची तारीख सांगितली. 'कर्जमाफीचा निर्णय लवकर द्यायचा आहे. कर्जमाफी अहवाल परदेशी कमिटी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारला देईल. त्यानंतर ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल.', अशी माहिती कृषिमंत्र्यांनी दिली आहे. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी ही महत्वाची माहिती दिली.

कृषिमंत्री दत्ता भरणे कर्जमाफीबद्दल म्हणाले की, '३० जूनपर्यंत कर्जमाफी केली जाईल. यासंदर्भात परदेशी कमिटी काम करत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी परदेशी कमिटी स्थापन केलेली आहे. ही कमिटी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्जमाफीबाबत निर्णय घेईल. कुठल्या घटकाचा समावेश केला पाहिजे आणि कशापद्धतीने शेतकऱ्याला मदत केली पाहिजे हे सांगितले जाईल.एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही कमिटी आम्हाला अहवाल देईन आणि शेतकऱ्याच्या बाबतीत याबाबत आम्ही बसून निर्णय घेऊ.'

तसंच, 'मागच्या आठवड्यातच केंद्राला तो अहवाल पाठवला आहे. १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. १ कोटी २ लाख हेक्टर पिकांना फटका बसला आहे. २८ जीआर राज्य सरकारने काढले आहेत. केंद्र सरकारची मदत मिळणार आहे या आशेवरच राज्य सरकारने शेतकऱ्याला आधीच मदत केली आहे. अहवाल अचूक असला पाहिजे. शेतकऱ्यांना मदत केली आहे. के वाय सीबाबत युद्ध पातळीवर काम चालू आहे. ते काम लवकरच पूर्ण होईल.' असं आश्वासन कृषिमंत्र्यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: धावत्या ट्रेनमध्ये टीसीने केला विद्यार्थिनीवर बलात्कार; तिकीट चेक करताना पकडलं नंतर एसी कोचमध्ये नेत...

Dog Bite: कुत्रा चावला, ३ इंजेक्शनही घेतले, पण..; उपचारादरम्यान ८ वर्षाच्या मुलाचा रुग्णालयातच मृत्यू

Akki Roti Recipe: सकाळच्या नाश्ताला काही वेगळं करायचंय? तर अक्की रोटी अन् नारळाची चटणी एकदा करून पाहाच

Maharashtra Live News Update: पुणे महापालिका मुख्य सभेत पाणी प्रश्नावरून काँग्रेस आक्रमक

Women Weight Loss: महिलांमध्ये अचानक वजन वाढण्याची कारणे कोणती?

SCROLL FOR NEXT