Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत आश्वसन दिलं. कर्जमाफीसाठी ९ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
Maharashtra Farmer Loan Waiver
CM Devendra Fadnavis announces the date for farmer loan waiver, bringing relief to thousands of distressed farmers in Maharashtra.saam tv
Published On

अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून सरकार शेतकरी कर्जमाफीचं निर्णय कधी घेणार? शेतकऱ्यांना कधी कर्जमाफी दिली जाणार असा प्रश्न विचारला जात होता. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी कधी दिली जाणार याची तारीख सांगून दिली आहे.

शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी आंदोनल पुकरलं होतं. काल रेल्वे रोको आंदोलन केल्यानंतर आज मुख्यमंत्र्यासोबत बैठक झाली. या बैठकीला बच्चू कडू यांच्यासोबत सर्व शेतकरी नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देण्याचं आश्वसन दिलंय. सरकार शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

महायुतीचं सरकारच्या आश्वसनाच्या पत्रात शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत घोषणा केली होती. त्यानुसार मागील काळात आम्ही एक समिती नेमली होती, त्यातून कर्जमाफी कशी करायची? दीर्घकाळीन मदत कशी करायची का ? अशा निर्णय घेण्यात आला होता. कर्जमाफी हा एक विषय आहे, शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात का अडकतो.

त्यातून शेतकऱ्यांना याच्यातून कसं बाहेर काढता येईल याचे विचार सरकारकडून केला जात होता. त्याचदृष्टीने आम्ही मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी आहेत, त्यांच्या नेतृत्वात एक समिती नेमण्यात आलीय. ही समिती कर्जमाफीबाबत निर्णय घेणार आहे.

Maharashtra Farmer Loan Waiver
पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, 3, 5 आणि 8 रूपयांची नुकसान भरपाई

कर्जमाफी कशी करता येईल. त्याचे निकष कसे असतील. शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कसं बाहेर काढता येईल. तसेच शेतकरी थकीत कर्जात जाणार नाही याबाबत समिती काम करेल. यासंदर्भात आज आम्ही एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीनं कामकाज पूर्ण करावं. कर्जमाफी कशी करायची, याचे निकष काय ठरवायचे. याचा अहवाल ही समिती देईल.या अहवालावरून कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाईल. ही कर्जमाफी तीन महिन्यात म्हणजेच ३० जून पूर्वी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला सरकारनं घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com