पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, 3, 5 आणि 8 रूपयांची नुकसान भरपाई

PM Crop Insurance Scheme: आधीच अस्मामी संकटाने पिचलेल्या शेतकऱ्यांची सरकारने क्रूर थट्टा केलीये. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ 3 रुपये, 5 रुपये जमा झाल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय.
Angry farmers from Akola return crop insurance cheques after receiving only ₹3 to ₹21 compensation under PM Crop Insurance Scheme.
Angry farmers from Akola return crop insurance cheques after receiving only ₹3 to ₹21 compensation under PM Crop Insurance Scheme.Saam Tv
Published On

अतिवृष्टीने बळीराजा जेरीस आला आहे. मराठवाडा, विदर्भात होत्याचं नव्हतं झालंय. अशा अस्मानी संकटातून बळीराजा कसाबसा सावरत असतानाच आता पीक विमा नुकसान भरपाईच्या नावानं जखमेवर मिठ चोळलंय. कारण अकोला जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईचे आकडे ऐकून तुमचीही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. केवळ 3 रुपये, 5 रुपये, 8 रुपये, 21 रुपये अशी नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केलीये. शासनाला जर शेतकऱ्यांचा सन्मान करता येत नसेल तर असे दोन-पाच रुपये देऊन अपमान तरी करू नये, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सुमारे 20 ते 25 शेतकऱ्यांच्या खात्यात अशी तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे.शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे धनादेशच्या स्वरूपात परत केलीय. शेतकऱ्यांची थट्टा करणे थांबवावे, अशी विनंती ही शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. आधीच अस्मानी संकटाने पिचलेल्या शेतकऱ्यांना आता सुल्तानी संकटाचेही चटके सहन करावे लागत आहेत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com