इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांची कृषिमंत्रीपदी निवड
पदभार स्वीकारण्याआधीच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न
दत्ता भरणे म्हणाले, “कर्जमाफीवर निर्णय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री घेतील”
कृषी धोरणात नाविन्य आणण्यावर भर देणार असल्याचे भरणेंचे विधान
Datta Bharne appointed as Maharashtra’s Agriculture Minister : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात थोडा फेरबदल करण्यात आला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण हे जबाबादारी स्वीकारण्याआधीच कृषिमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर प्रश्न विचारण्यात आला. दत्ता भरणे यांना कृषिमंत्रिपदाची लॉटरी लागल्यानंतर इंदापूरमध्ये जल्लोष करण्यात आला. दत्ता भरणे यांनी प्रसारमाध्यमांशी सवांद साधत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.
दत्ता भरणे यांना कृषिमंत्रिपद मिळताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नाला तोंड द्यावे लागलेय. कर्जमाफीचा प्रश्न विचारताच दत्ता भरणे म्हणाले की, "अजून मी पदभार स्वीकारलेला नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे, त्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही मंडळी योग्य तो निर्णय घेतील."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील सर्वांनी माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खात मिळते यासारखा आनंद कुठला असू शकतो. कृषी खात्याच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, शेतकऱ्यांच्या शेतीत नाविन्यपूर्ण शेतीचे उपक्रम कसे राबवतातील यावर माझा भविष्यात भर राहणार आहे, असे दत्तात्रय भरणे म्हणाले.
शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो आणि शेतीच्या प्रत्येक पैलूचा अनुभव घेतला आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचे दु:ख, अडचणी आणि अपेक्षा मला अंतःकरणाने समजतात. आता मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मला त्यांच्या न्यायासाठी, हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी मिळाली आहे. शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी हे माझे मुख्य उद्दिष्ट राहील. शासनाच्या प्रत्येक धोरणामध्ये शेतकऱ्यांचा आवाज पोहोचवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे दत्ता भरणे म्हणाले.
दत्तात्रयभरणे कोणत्या पक्षाचे आहेत?
दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत.
दत्तात्रय भरणे यांना कोणते खाते मिळाले आहे?
दत्तात्रय भरणे यांना महाराष्ट्र सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून नेमण्यात आले आहे.
दत्तात्रय भरणे कोणत्या मतदारसंघाचे आमदार आहेत?
दत्तात्रय विठोबा भरणे हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) आमदार आहेत. ते इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे शिक्षण किती झाले आहे?
दत्तात्रय भरणे यांनी बी.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले आहे. ते विवाहित असून, त्यांच्या पत्नीचे नाव सारिका आणि त्यांना एक मुलगा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.