Datta Bharane : कोकाटेंमुळे दत्ता भरणेंना लॉटरी, कृषिमंत्र्यांचे शिक्षण अन् संपत्ती किती? वाचा सविस्तर

Datta Bharane Education And Net Worth: दत्ता भरणे यांच्याकडे कृषीमंत्रीपद देण्यात आले आहे. दत्ता भरणे यांचा सामान्य कार्यकर्ता ते मंत्रीपदापर्यंतचा प्रवास जाणून घ्या.
Datta Bharane
Datta BharaneSaam Tv
Published On
Summary
  • कृषीमंत्री पदावर दत्ता भरणे यांची वर्णी

  • दत्ता भरणे यांचा राजकीय प्रवास

  • दत्ता भरणे यांचे शिक्षण आणि संपत्ती

काल मंत्रीमंडळात बदल करण्यात आला आहे. माणिकराव कोकाटेंना कृषीमंत्री पदावरुन काढून टाकण्यात आले असून त्यांच्याकडे क्रिडा खाते देण्यात आले आहे. तर आता कृषीमंत्रीपदी इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांची वर्णी लागली आहे. दत्ता भरणे यांना कोणताही राजकीय वारसा लाभलेला नाही. दत्ता भरणे यांचा सामान्य कार्यकर्त्यापासून ते मंत्रीपदाचा हा प्रवास चांगला आहे.

Datta Bharane
Datta Gade : दत्ता गाडेच्या मोबाईलचा तपास सुरु, कुणाकुणाला फोन अन् कुणाला पैसे पाठवल्याची चौकशी करणार

दत्ता भरणे यांचा मंत्रीपदापर्यंतचा प्रवास

दत्ता भरणे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यांना कोणताही राजकीय वारसा नाही. दत्ता भरणे यांना अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जाते. त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालकपदाची धुरा सांभाळली. त्यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालकपदी काम करण्याचीही संधी मिळाली.

यानंतर त्यांनी भवानीनगरच्या श्री धत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपदी काम केले. २००९ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी बंडखोरी करुन निवडणूक लढवली. त्यांचा पराभव झाली. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.

दत्ता भरणे यांनी आपल्या कामामुळे गावागावांमध्ये आपली ओळख निर्माण केली. त्यांनी २०१४, २०१९ च्या निवडणुकीत विजय मिळवला. २०२४ मध्येदेखील त्यांनी बाजी मारली. सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले.

दत्ता भरणे यांचे शिक्षण (Datta Bharane Graduation)

दत्ता भरणे यांचा जन्म १५ एप्रिला १९६९ मध्ये झाला. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. दत्ता भरणे यांनी आपले प्राथमिक शिक्षण भरणेवाडी येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी बॅचलर ऑफ कॉमर्स पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी साखर कारखान्याचे संचालकपदी काम करत राजकारणात प्रवेश केला.

Datta Bharane
Datta Bharane : पालकमंत्री असतो तर सोलापूरच्या जनतेने मला डोक्यावर घेतलं असतं; दत्ता भरणे यांचा जयकुमार गोरे यांना टोला

दत्ता भरणे यांची संपत्ती (Datta Bharane Net Worth)

दत्ता भरणे यांच्या नावावर एकूण १,००,००० रुपये आहेत तर पत्नीच्या नवावर १,५०,००० रुपये आहेत. बँकेत आणि इत्तर वित्तीय संस्थांमध्ये १,६८,२२४ रुपयांची ठेवी आहे.त्यांचे कंपन्यांमध्ये रोख रक्कम, शेअर्स आहेत. छत्रपती सह. सा. का भवानीगर येथे ५१००० रुपयांचे शेअर्स आहे. सोनाई दूध या ठिकामी २५००० रुपये आहेत. त्यांच्या नावावर अनेक कंपन्यांने शेअर्स आहेत. त्यांच्या नावावर लाखो रुपयांची शेतजमीन आहे. याचसोबत त्यांनी पुण्यातदेखील घर आहे.

Datta Bharane
Maharashtra Cabinet Reshuffle : कोकाटेंची उचलबांगडी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com