Maharashtra Farmer : पैसे द्या नाहीतर मेलेली म्हैस घ्या! शेतकऱ्याचा संताप उफाळला, मृत म्हशीसह बँकेसमोर आंदोलन

Palgahr News : पालघर जिल्ह्यात विमा रक्कम न मिळाल्याने शेतकऱ्याने मृत म्हशीला ट्रॅक्टरमधून आणून बँकेसमोर ठेवत अनोखे आंदोलन केले. तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांवर शेतकऱ्यांनी फसवणुकीचे आरोप करत संताप व्यक्त केला आहे.
Maharashtra Farmer : पैसे द्या नाहीतर मेलेली म्हैस घ्या! शेतकऱ्याचा संताप उफाळला, मृत म्हशीसह बँकेसमोर आंदोलन
Palgahr NewsSaam Tv
Published On
Summary

मोखाड्यात विमा न मिळाल्याने शेतकऱ्याने मृत म्हशीसह बँकेसमोर अनोखे आंदोलन केले

शेतकऱ्यांनी पैसे परत घेण्याची ठाम भूमिका घेतली

बँक ऑफ बडोदा कर्मचाऱ्यांवर शेतकऱ्यांचा फसवणुकीचा आरोप

इतर शेतकऱ्यांनाही विमा रक्कम न मिळाल्याने संताप आणि आत्महत्येचा इशारा

पालघरमधील शेतकऱ्याने न्याय मिळवण्यासाठी अनोखं आंदोलन केल्याची घटना घडली आहे. मोखाडा तालुक्यातील शेतकऱ्याची म्हैस मृत झाल्यानंतर बँकेने विम्याची नुकसान भरपाई थकवली. याप्रकरणी न्याय मागण्यासाठी शेतकऱ्याने मृत म्हशीला बँकेसमोर आणत आंदोलन केलं आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोखाडा तालुक्यातील टाकपाडा गावातील पशुपालक शेतकरी नवसु दिघा यांनी आपल्या पारंपरिक शेतीला जोडव्यवसाय म्हणून सन २०२२ मध्ये बँक ऑफ बडोदा या मोखाडा शाखेतून जवळपास बारा लाखांचे कर्ज घेतले. या कर्जातून दहा दूधाळ म्हैस खरेदी केल्या तसेच चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनीकडून या म्हशीना भविष्यात काही समस्या उद्भवलास बँकेकडून विमा कवच सुद्धा घेतले होते. मात्र म्हैस खरेदी केल्यानंतर वर्षे दोन वर्षात त्यांच्या तबेल्यातील दोन म्हैसी मेल्या.

Maharashtra Farmer : पैसे द्या नाहीतर मेलेली म्हैस घ्या! शेतकऱ्याचा संताप उफाळला, मृत म्हशीसह बँकेसमोर आंदोलन
Shocking News : चौथीतील विद्यार्थिनीची आत्महत्या, शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन, नेमकं काय घडलं?

यातली पहिली म्हैस २०२३ मध्ये मेली आणि दूसरी म्हैस ३० नोव्हेंबर २०२५ रोजी मृत्यूमुखी पडली आहे. मात्र विमा काढलेला असतानाही मोखाडा बँक ऑफ बडोदा शाखेच्या आडमुठे कर्मचाऱ्यांमुळे दोन वर्षांपूर्वीचे नुकसान भरपाईचे पैसे नवसु दिघा यांना मिळालेले नाहीत. आता मेलेल्या म्हशीचे पण पैसे मिळणार नाहीत म्हणून दिघा यांनी आपली मेलेली म्हैस ट्रॅक्टर मध्ये भरुन बँकेच्या समोर आणून ठेवली. एकतर मला इन्शुरन्सचे पैसे द्या नाहीतर तुम्ही दिलेली म्हैस परत घेऊन टाका अशी ठाम भुमिका घेतली होती. त्यामुळे काहीकाळ बँकेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी येथे पोलीस प्रशासन ही तैनात झाले होते.

Maharashtra Farmer : पैसे द्या नाहीतर मेलेली म्हैस घ्या! शेतकऱ्याचा संताप उफाळला, मृत म्हशीसह बँकेसमोर आंदोलन
Rain Alert : तुळशीच्या लग्नाला पावसाची हजेरी, या जिल्ह्यांत कोसळधारेचा इशारा, जाणून घ्या सविस्तर

मोखाडातील बँक ऑफ बडोदा शाखेतील कर्मचाऱ्यांकडून नेहमी ग्राहकांची फसवणूक केली जाते असा आरोप सुध्दा यावेळी शेतकऱ्यांनी केला. त्याचप्रमाणे दोन वर्षांपूर्वी घोसाळी गावातील शेतकरी मधू माळी,गुंबाडपाडा गावातील शेतकरी आंबेकर यांनी देखील बँक ऑफ बडोदा शाखेतून कर्ज घेऊन म्हैसी खरेदी केल्या होत्या.

Maharashtra Farmer : पैसे द्या नाहीतर मेलेली म्हैस घ्या! शेतकऱ्याचा संताप उफाळला, मृत म्हशीसह बँकेसमोर आंदोलन
Political News : शिंदेंना मोठा धक्का, ज्येष्ठ नेत्याचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', काँग्रेसमध्ये केला प्रवेश

त्यांच्या म्हैशी मरुन दीड वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे, तरी सुद्धा त्यांना ही विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही. बँकेच्या या ढोबळ कारभारामुळे संतप्त झालेल्या काही पशुपालक शेतकऱ्यांनी त्यामुळे बँक ऑफ बडोदा शाखेतील कर्मचाऱ्यांकडून अशीच जबरदस्ती चालू राहीली तर आत्महत्या करण्याचा विचार करावा लागेल असा इशारा बँकेला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com