अकोल्यातील ज्येष्ठ नेते विजय मालोकार यांचा शिंदेंच्या शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'
मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला
दुर्लक्षित धोरणांमुळे कंटाळून मालोकार यांनी राजीनामा दिला
अकोल्यातील शिंदे गटाला या हालचालीमुळे मोठा राजकीय फटका बसू शकतो
अक्षय गवळी,अकोला
अकोल्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाला ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. . पक्षाचे जेष्ठ नेते, माजी जिल्हाप्रमुख आणि अमरावती विभागाचे माजी सहसंपर्कप्रमुख विजय मालोकार यांनी आज शिंदे सेनेला सोड चिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईतील प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय मालोकार यांनी आज शिंदे सेनेला रामराम करून पक्ष प्रवेश केला आहे. पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षित धोरणांना कंटाळून मालोकारांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचं समोर आलं आहे. मालोकार हे अकोला जिल्ह्यातील शिवसेनेच्या संस्थापक शिवसैनिकांपैकी एक आहेत.
विजय मालोकार यांच्या कारकीर्द बद्दल बोलायचं झाल्यास, शिवसेनेत जिल्हाप्रमुख, परिवहन महामंडळाचे (एसटी) संचालक, सहसंपर्कप्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे. १९९९ मध्ये मालोकार यांना तत्कालिन बोरगावमंजू मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. त्यात त्यांचा अल्प मतांनी पराभव झाला होता.
मात्र त्यानंतरच्या दोन निवडणुकीत त्यांना पक्षानं डावळल्यामूळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली होती. यात २००४ मध्ये ते अप्क्ष म्हणून ४० हजार मते मिळवत अल्प मतांनी पराभूत झाले होते. २००९ मध्ये 'जनसुराज्य पक्षा'चे उमेदवार म्हणून मालोकारांनी ३० हजार मते घेतली होती. मालोकार यांच्याकडे उत्कृष्ठ संघटक म्हणून पाहिले जाते. त्यांच्या राजीनाम्याने अकोल्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान जसजशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.