Shocking : बेडवर ढकललं, दाराची कडी लावली, मित्रासोबतचा फोटो व्हायरल करतो सांगत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, महाराष्ट्र हादरला!

Alibaug Crime News : अलिबाग शहरात एका अल्पवयीन मुलीवर धमकावून वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर दीड वर्ष अत्याचार केला. पोलिसांनी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे.
Shocking : बेडवर ढकललं, दाराची कढी लावली, मित्रासोबतचा फोटो व्हायरल करतो सांगत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, महाराष्ट्र हादरला!
Alibaug Crime NewsSaam Tv
Published On
Summary

अलिबागमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नराधमाने धमकी देत गेले दीड वर्ष केला बलात्कार

आरोपी फरार आहे

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत

पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अलिबागमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. शहरातील एका अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरम्यान आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित अल्पवयीन मुलीला सदर आरोपीने मुलीचा आणि तिच्या मित्रासोबतचा फोटो तिच्या कुटुंबियांना दाखवण्याची तसेच सोशल मीडियावर तो फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. या फोटोचा वापर करून आरोपीने पीडितेला सतत आपल्या घरी बोलवलं. एके दिवशी घरात बोलावून दरवाज्याला कडी लावून मुलीला बळजबरीने बेडवर ढकललं.

Shocking : बेडवर ढकललं, दाराची कढी लावली, मित्रासोबतचा फोटो व्हायरल करतो सांगत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, महाराष्ट्र हादरला!
Shocking News : कंपनी मॅनेजरची कर्मचारी महिलेवर वाईट नजर, बलात्कार करून खंडणी उकळली, बायकोचीही नवऱ्याला साथ

पीडितेला बेडवर ढकलताचं ती नाही म्हणत असताना देखील नराधमाने तिच्या अंगाला अश्लीलपणे स्पर्श करत तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार गेले दीड वर्ष सुरु असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पीडितेने मन एकवटून घडलेली घटना कुटुंबियांना सांगितली असता. कुटुंबियांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

Shocking : बेडवर ढकललं, दाराची कढी लावली, मित्रासोबतचा फोटो व्हायरल करतो सांगत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, महाराष्ट्र हादरला!
Shocking : नागपूर हादरलं! १२ वर्षांच्या मुलीला लॉजवर नेलं, नराधमांनी बलात्कार करून व्हिडिओ काढले

या प्रकणाची तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली. अलिबाग शहराला हादरवणाऱ्या या घटनेप्रकरणात अलिबाग पोलीस ठाणे इथं भारतीय दंडसंविधानान्वये २०२३ च्या कलम ७५, ७६, ७७, ७८, ७९ तसंच बालकांच्या लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा करणाऱ्या पोक्सो (POCSO) कलम ८,१२ आणि १७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना मासे यांच्या माहितीनुसार या प्रकरणाचा पुढील तपास यंत्रणा करत आहेत. दरम्यान आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा मागोवा घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com