Devendra Fadnavis  Saam Tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis on Narcotics : ड्रग्स प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिसांना बडतर्फ करणार : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : ड्रग फ्री महाराष्ट्र करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

Bharat Jadhav

Devendra Fadnavis on Narcotics :

ड्रग माफिया ललित पाटील प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली जातेय. तर ललित पाटीलच्या प्रकणावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान राज्यात ड्रग्सचा पसार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच ड्रग्स प्रकरणात सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. (Latest News)

नागपूर येथील विमानतळावर पत्रकरांशी देवेंद्र फडवणीस बोलात होते. जे जे लोक यात सहभागी असतील. त्यांच्यावर सर्वात कडक कायदे लावण्यात येतील. आपण ड्रग फ्रि महाराष्ट्र हे अभियान सुरू केलं आहे. अनेक मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये छापेमारी सुरू केलीय. आपल्याला एक मोठी लढाई लढावी लागणार असून ही लढाई राष्ट्रीय स्तरावर देखील लढणं सुरू केलंय. जेव्हापासून आपण हे सुरू केलं, त्यानंतर मोठ्या प्रमाणात इंटर स्टेट मुव्हमेंट ट्रक केलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जे लोकं ड्रग तयार करत होते, कारखाना टाकून ड्रग तयार करत होते, या लोकांवर कारवाई सुरू झालीय. जे अपराधी असतील त्यांच्यावर मोठी कारवाई होईलच याशिवाय जे पोलीसवाले यात सहभागी असतील त्यांना फक्त निलंबित न करता त्यांना बडतर्फ केलं जाईल.

दरम्यान ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे शिवसेना नेत्यांवर आरोप करत आहेत. अंधारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर देखील आरोप केले आहेत. याप्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करू नयेत. कारण ते फिरुन आपल्याकडेच येत असतात. ललित पाटील प्रकरणात देखील असेच झाले.

एल्विश यादव मुख्यमंत्री शिंदेंच्या बंगल्यावर कसा?

एल्विश यादव यांच्या घरात पाच जिवंत कोब्रा आणि बंदी घालण्यात आलेले विष सापडल्यामुळे तो अडचणीत आला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान एल्विश हा मुंबईत लपला होता, गणेशोत्सवाच्या काळात तो मुख्यमंत्र्यांची निवासस्थानी वर्षा बंगल्यावर गेला होता. त्यावरून मुख्यमंत्री शिंदेवर आरोप केले जात आहेत. याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात अनेकजण वर्षा बंगल्यावर जात असतात.

वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रेटी जात असतात. एल्विश यादव हा त्यावेळी बिग बॉस हा रिआलटी शो जिंकला होता. तो एक सेलिब्रेटी होता, असे अनेक सेलिब्रिटी येथे जात असतात. ज्यावेळी एल्विश यादव वर्षा बंगल्यावर गेला होता त्यावेळी त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा आरोप नव्हता. आता त्याच्यावर आरोप आहेत, असा जर आपण त्याचा हिशोब करायला लागलो तर राज्यातील अनेक पुढाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागेल. त्यामुळे काही वाटलं लगेच मुख्यमंत्र्यांवर आरोप केले जात. उबाटा जे नेते आहेत, त्याचे हे धंदे चालवले आहेत, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :अण्णा बनसोडे 4300 मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT