Gas Cylinder : कमाल झाली...गॅस टंचाईच्या काळात हॉस्पिटलमधील सिलिंडरची चोरी

Buldhana Hospital Gas Cylinder Stolen: बुलढाण्यातल्या एका हॉस्पिटलमधून चक्क सिलिंडरची चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय. चोरट्यांनी हॉस्पिटलमधील स्वयंपाकघराचे कुलूप तोडून भरलेला गॅस सिलिंडर आणि ऑक्सिजन पाईपलाईन लंपास केली.

संजय जाधव, बुलढाणा, साम टीव्ही

संपूर्ण देशात गॅस तुटवडा असताना बुलढाण्यातील टीबी हॉस्पिटलमध्ये गॅस सिलिंडर चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. हॉस्पिटलच्या स्वयंपाकघराची खिडकी आणि दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी भरलेला गॅस सिलिंडर आणि इतर साहित्य लंपास केले.

टीबी हॉस्पिटलच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या १७ गॅस सिलिंडरपैकी एक भरलेला सिलिंडर चोरट्यांनी पळवला. याशिवाय स्वयंपाकघरातील इतर साहित्य देखील लंपास करण्यात आले. विशेष म्हणजे हॉस्पिटलमधील तांब्याची ऑक्सिजन पाईपलाईन देखील काढून नेण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे हॉस्पिटल प्रशासनात खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com