Maratha Aarakshan: माझ्या ४ पिढ्यांची कुणबी नोंद, आता जरांगेंवर मराठा आरक्षणासाठी उपोषणाची वेळ येणार नाही; भाजप आमदाराचा मोठा दावा

Maratha Reservation Protest: हिंगोलीमध्ये भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या कुटुंबातील चार पिढ्या जुने मराठा कुणबी नोंद असलेले पुरावे सापडलेत.
Maratha Aarakshan News
Maratha Aarakshan NewsSaam TV
Published On

Maratha Aarakshan News:

भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याकडे चार पिढ्यांचे जुने कुणबी नोंदी असलेले पुरावे सापडले आहेत. आता मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले मिळणार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही, असा दावा मुटकुळे यांनी केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Aarakshan News
Pune Crime : पाच दिवस डांबून ठेवत RPF जवानाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; प्रियकरासोबत छत्तीसगडवरून गाठलं होत पुणे

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलनाचा लढा उभा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडून राज्यसरकारने दोन महिन्यांची मुदतवाढ घेतली आहे. यानंतर राज्यभरात मराठा कुणबी नोंदी असलेले पुरावे शोधण्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे . दरम्यान, हिंगोलीमध्ये भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या कुटुंबातील चार पिढ्या जुने मराठा कुणबी नोंद असलेले पुरावे सापडलेत.

त्यामुळे आता सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले मिळणार असल्याचा दावा आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी केला आहे. या सोबतच जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, असंही मुटकुळे म्हणाले आहेत.

पंढरपुरात ५५० मराठा कुणबी नोंदीचे जूने दस्तावेज सापडले

मराठा समाज कुणबी असल्याचा दावा दाव्याला खरा ठरवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात पुष्टी मिळालेली असतानाच आता पंढरपूर तालुक्यातील दहा गावांमध्ये जवळपास ५५० मराठा कुणबी अशा नोंदीचा जूना दस्तावेज हाती लागला आहे.

मुख्यमंत्र्यांनी जूने दस्तावेज तपासणीचे आदेश दिल्यानंतर आज पंढरपूर येथील तहसील कार्यालयात जूने दस्तावेज तपासणीचे काम सुरू आहे. त्यामध्ये एकाच भोसे गावात २५० मराठा कुणबी अशा नोंदी सापडल्या आहेत तर तालुक्यातील इतर दहा गावांमध्ये सुमारे ५५० नोंदी सापडल्या आहेत.

Maratha Aarakshan News
Wardha Crime News : औषधी दुकानाचा सकारात्मक अहवालासाठी १० हजार रुपयांची मागणी; लाच स्वीकारताना निरीक्षकाला अटक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com