Wardha Crime News : औषधी दुकानाचा सकारात्मक अहवालासाठी १० हजार रुपयांची मागणी; लाच स्वीकारताना निरीक्षकाला अटक

Wardha Crime : लाचखोर अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षकाला अटक करण्यात आलीय
wardha crime
wardha crimesaam Tv
Published On

Wardha Crime:

औषधी दुकान आणि एजन्सीचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी लाच घेणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षकाला अटक झालीय. अहवाल पत्रासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडण्यात आलंय. (Latest News)

औषधी दुकान आणि एजन्सीचा सकारात्मक अहवाल तयार करायण्यासाठी निरीक्षकाने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. या लाचेची ७ हजार रुपयांची रक्कम निरीक्षकाने मध्यस्थीमार्फत स्वीकारली होती. लाचखोर निरीक्षकाचं नाव सतीश हिरसिंग चव्हाण (४८ रा. वर्धा) आहे. निरीक्षकासह मध्यस्थी प्रवीण यादवराव पाथरकर (४६ रा. केळकरवाडी) यांनाही अटक करण्यात आलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्धेतील स्नेहलनगर येथील ३७ वर्षीय तक्रारदाराचे औषध दुकान आणि एजन्सीचा व्यवसाय आहे. लाचखोर औषध निरीक्षक सतीश चव्हाण हे निरीक्षणासाठी गेले असता निरीक्षणाचा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने सकारात्मक तयार करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे १० हजारांची लाच मागितली. दरम्यान प्रवीण पाथरकर याच्या मार्फतीने ही रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. प्रविण पाथरकर याच्या मार्फतीने ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना औषध निरीक्षक चव्हाण याला रंगेहात पकडले. दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे, पोलिस निरीक्षक प्रीती शेंडे यांच्या निर्देशात सचिन मते, पोलिस निरीक्षक निलेश उरकुडे, भरतसिंग ठाकूर, भागवत वानखेडे, दिपाली भगत, सागर देशमुख यंनी केली.

wardha crime
Pune Crime : पाच दिवस डांबून ठेवत RPF जवानाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; प्रियकरासोबत छत्तीसगडवरून गाठलं होत पुणे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com