knife Attack In Pune : क्षुल्लक कारणावरून पुणे शहरातील दोन ठिकाणी चाकू हल्ला

Pune crime: रेल्वे स्टेशन आणि डेक्कन परिसरात चाकू हल्ल्याची घटना घडलीय.
Pune crime
Pune crimesaam Tv
Published On

knife Attack In Pune :

क्षुल्लक कारणावरून शहरातील दोन ठिकाणी चाकू हल्ला झाल्याची घटना घडलीय. पहिली घटना रेल्वे स्टेशनजवळील भुयारी मार्गात घडली. तर दुसरी घटना ही डेक्कन परिसरात घडलीय. याप्रकरणात एकाला अटक करण्यात आलीय. (Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली चाकू हल्ल्याची घटना पुणे रेल्वे स्टेशनजवळ भुयारी मार्गात घडली. सूरज परताने असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस नाईक कृष्णकांत श्रीराम यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय. त्यावरून अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूरज परताने हे रेल्वे भुयारी मार्गातून जात असताना एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडे तंबाखू मागितली. सूरज यांनी तंबाखू दिली नाही. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि अनोळखी व्यक्तीने सूरज यांच्या पोटात चाकू भोसकला. या हल्ल्यात सूरज गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक संदीप मधाळे यांनी दिली.

तर दुसरी चाकू हल्ल्याची घटना डेक्कन परिसरात घडली. या घटनेत एका विद्यार्थ्याने इन्स्टिट्यूट चालकावर चाकू हल्ला केलाय. अभ्यासक्रमातून काढल्याच्या राग आल्याने विद्यार्थ्याने हा हल्ला केला. संकल्प योगेश जांदे (वय २३, रा. आंबेगाव बुद्रुक जांभुळवाडी रस्ता, कात्रज) असं इन्स्टिट्यूट चालकाचं नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी ऋषिकेश अशोक नाडे या तरुणाला अटक केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली महाराज रस्त्यावर कर्णिक प्लाझा इमारतीमध्ये आयटी प्रिन्यूअर नावाचे इन्स्टिट्यूट आहे. दरम्यान चाकू हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याची वर्तणूक चांगली नसल्यामुळे जांबे यांनी त्याला अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा इ-मेल केला होता. त्याचा राग मनात ठेवून विद्यार्थ्याने अभ्यासक्रमास प्रवेश द्या, नाहीतर जीवे मारतो, अशी धमकी देत जांबे यांच्याच्या पोटात चाकू भोसकला.

Pune crime
Pune Crime : पाच दिवस डांबून ठेवत RPF जवानाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; प्रियकरासोबत छत्तीसगडवरून गाठलं होत पुणे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com