Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशन रोज 5 तास राहणार बंद, प्रवाशांचे होणार हाल; वाचा नेमकं कारण

Pune Latest News: फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे पुणे रेल्वे स्टेशन दररोज पाच तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
Pune Railway Station
Pune Railway StationSaam Tv

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पुणे रेल्वे स्टेशन (Pune Railway Station) यापुढे दररोज पाच तास बंद राहणार आहे. फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे (Platform Widening Works) पुणे रेल्वे स्टेशन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. तसंच या कामामुळे लांबपल्ल्यांच्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Pune Railway Station
Bandra Versova Sea Link : वांद्रे-वर्सोवा सी लिंक 'स्वातंत्रवीर सावरकर सागरी सेतू' म्हणून ओळखला जाणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार, फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे पुणे रेल्वे स्टेशन दररोज पाच तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणाचे काम काही दिवसांत सुरू होणार आहे. यासाठी दररोज चार ते पाच तास पुणे रेल्वे स्थानक पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहे. या काळामध्ये पुणे रेल्वे स्थानकावर एकही गाडी येणार नाही किंवा जाणार नाही.

पुणे रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. रेल्वे स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणाचे काम काही वर्षांपासून प्रलंबित आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून या कामासाठी 108 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. रिमॉडेलिंगचे काम सुरू झाल्यानंतर पुढचे काही महिने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Pune Railway Station
Pune Accident : बेशिस्त बाईकचालकांचा उच्छाद, भरधाव बाईकच्या धडकेत महिलेचा मृत्यू; अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

पुणे रेल्वे स्थानकावरुन 155 रेल्वे गाड्या धावतात. यापैकी 65 गाड्या पुणे विभागातून सुटतात. तर काही गाड्या हडपसर, शिवाजीनगर येथून सोडण्याचे नियोजन केले जात आहे. फलाट विस्तारीकरणाच्या या कामामुळे पुणे रेल्वे स्थानकावरुन बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकच पाहून याकाळामध्ये प्रवास करणे फायदेशीर ठरेल. नाही तर त्यांना रेल्वे स्थानकावरच थांबावे लागेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com