मांजराने लव बर्ड्सचा पिंजरा पाडला; दोन शेजाऱ्यांचा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला, गुन्हा दाखल

Cat Knocks Lovebirds Cage Neighbour Fight Pune: पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात मांजराने लव बर्ड्सचा पिंजरा पाडल्याच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद झाला.
Cat Knocks Lovebirds Cage Neighbour Fight Pune
Cat Knocks Lovebirds Cage Neighbour Fight PuneAI
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुण्यात कधी काय होईल आणि कोण कोणावर कशा पद्धतीने गुन्हा दाखल करेल हे सांगता येत नाही. मांजराचा आणि लव बर्ड्सचा वाद थेट पोलीस स्टेशन मध्ये गेला आणि मांजर मालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

Cat Knocks Lovebirds Cage Neighbour Fight Pune
Accident News : बाइकवरून निघाले, शाळेसमोरच्या रस्त्यावरच अघटित घडलं; जेसीबीच्या धडकेत २ तरुणांचा मृत्यू

नेमकं काय घडलं?

पुण्यातील ताडीवाला रोड परिसरामध्ये भारत तरुण मंडळासमोर मांजर आणि लव बर्ड्समुळे दोन शेजाऱ्यांमध्ये चांगलाच वाद रंगला आणि त्याचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. या प्रकरणी मांजरीचा मालक दिनेश रंगराव पोताबत्तोनी याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक सिंग हे ताडीवाला रस्त्यावर कुटुंबासह राहतात. त्यांनी घरात लव बर्ड्स पाळले असून त्याचा पिंजरा घरासमोर ठेवलेला असतो. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दिनेश पोताबत्तोनी यांनी मांजर पाळले आहे. हे मांजर परिसरात मोकळेपणाने फिरत असल्याने ते वारंवार सिंग यांच्या घरासमोर येऊन पोपटाच्या पिंजऱ्याशी चाळे करत होते.अनेकदा त्या मांजरीने लव बर्ड्सचा पिंजरा ढकलून दिल्याचा प्रकार घडला होता.

Cat Knocks Lovebirds Cage Neighbour Fight Pune
New Highway: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेसह ३ महामार्गांवरील वाहतूक कोंडीचा ताण होणार हलका; पर्यायी रस्ता बांधणार, कसा असेल हा मार्ग?

त्यामुळे सिंग यांना त्याचा त्रास होत होता. याबाबत त्यांनी दिनेश यांना मांजरीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. मात्र याच गोष्टीचा राग येऊन दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली, आणि वादावादीचे रूपांतर हे हाणामारीत झाले. सुरुवातीला दोघांमध्ये तोंडी वाद झाला. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यही यात सहभागी झाले आणि पाहता पाहता वाद वाढत गेला. काही वेळातच दोन्ही बाजूंचे लोक रस्त्यावर आले आणि एकमेकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करू लागले. त्यानंतर या वादाचे रुपांतर तुंबळ हाणामारीत झाले आणि हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत गेला.

Cat Knocks Lovebirds Cage Neighbour Fight Pune
LPG Cylinder: वेळीच व्हा सावध! गॅस बुकिंगच्या नावाखाली बँक अकाऊंट होतंय रिकामं; या चूका टाळा

आमची मांजर त्यांच्या पोपटाकडे गेली का हे आम्हाला माहिती नाही कारण त्यांच्याकडे ही मांजर आहेत. याबाबत दिनेशच्या आईने मुक्या प्राण्यांचा वाद आहे. तो माणसांमध्ये सुरू झाला असं सांगितलं. अभिषेकच्या बहिणीने दिनेशला सांगितलं की तुझ्या मांजरांचे हातपाय तोडू तुझी मांजर आमच्या लव बर्ड्सकडे येतात त्याच्या पिंजऱ्यावर पंजे मारतात. यावरून हा वाद सुरू झाला. या मारहाणीत अभिषेक सिंग यांना दुखापत झाली. त्यामुळे त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत मांजरीचा मालक दिनेश रंगराव पोताबत्तोनी याच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मांजर आणि लव बर्ड्समुळे शेजाऱ्यांमध्ये एवढा मोठा वाद झाल्याची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे. हे लव बर्ड्स आहेत. मांजर येऊन त्यावर पंजे मारते आम्ही त्यांना समजून सांगितला आणि त्यांनी मारहाण सुरू केली. असं फिर्यादी अभिषेक सिंग यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com