संजय कदम, प्रतिनिधी
राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. कालपासून या लढ्याला हिंसक वळण लागले. राजकीय नेत्यांना गावबंदी, नेत्यांची घरे जाळल्याच्याही घटना समोर येत आहेत. गावागावांमध्ये उपोषणे, आंदोलने सुरू असून नागपूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून रस्त्यावर उतरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून ठिकठिकाणी आंदोलन, जाळपोळ होत असून आज नागपूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगाव मही येथ मराठा समाज आक्रमक झाला.
गावातील मराठा आंदोलकांनी रस्त्यावर उतरुन असून देऊळगाव मही येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. अर्ध्या तासांपासून रास्ता रोको होत असल्याने यामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी होत असून तत्काळ आरक्षण मिळावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
साताऱ्याच्या माण तालुक्यात आंदोलनाला हिंसक वळण..
दरम्यान, साताऱ्याच्या माण तालुक्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. रात्री मुक्कामी असलेली बस फोडल्याचा प्रकार गोंदवले गावात घडला आहे. यामुळे सातारच्या दहिवडी आगारातून सकाळपासून (St Bus) बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.