Apple Alert News : देशातील राजकीय नेते आणि काही पत्रकारांचे आयफोन टार्गेटवर, ॲपल कंपनीने काय इशारा दिलाय?

Apple Alert to Politician : अॅपल आयडीद्वारे जोडलेल्या आयफोन्सना स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्सद्वारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Apple
AppleSaam Tv
Published On

Apple Alert News :

भारतातील विरोधी पक्षातील नेत्यांना Apple कंपनीने अलर्ट मेसेज पाठवला आहे. Apple ने 31 ऑक्टोबर रोजी भारतातील काही नेत्यांना अलर्ट मेसेज पाठवला आहे. 'स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्स' द्वारे काहींनी टार्गेट केलं जाऊ शकतं.

अॅपल आयडीद्वारे जोडलेल्या आयफोन्सना स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्सद्वारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षनेत्यांनी ही माहिती दिली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Apple
Bus Accident News : गुजरातमध्ये SRP जवानांच्या बसला भीषण अपघात, 38 जवान जखमी

राजकारण्यांव्यतिरिक्त काही पत्रकारांनाही अॅपलच्या माध्यमातून अलर्ट मेसेज येत असल्याचे समोर आले आहे. अॅपलच्या माध्यमातून ज्या नेत्यांना अलर्ट पाठवण्यात आला आहे.

यामध्ये टीएमसी खासदार महुआ मोईत्रा, पवन खेडा, प्रियांका चतुर्वेदी, अखिलेश यादव यांच्यासह ११ जणांचा समावेश आहे.

कुणाचा समावेश?

  1. महुआ मोइत्रा (तृणमूल काँग्रेस, खासदार)

  2. प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना, खासदार)

  3. राघव चढ्ढा (आप, खासदार)

  4. शशी थरूर (काँग्रेस, खासदार)

  5. असदुद्दीन ओवेसी (AIMIM, खासदार)

  6. सीताराम येचुरी (सीपीआय एम)

  7. पवन खेरा (काँग्रेस प्रवक्ते)

  8. अखिलेश यादव (समाजवादी पक्षाचे अध्यक्ष)

  9. सिद्धार्थ वरदराजन (संस्थापक संपादक, द वायर )

  10. श्रीराम कारी (निवासी संपादक, डेक्कन क्रॉनिकल )

  11. समीर सरन (अध्यक्ष, ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन) (Latest Marathi News)

Apple
Pune News: सकाळी लॉजवर गेले अन् सायंकाळी भयानक अवस्थेत आढळले; पुण्यात प्रेमीयुगुलासोबत काय घडलं?

मेसेजमध्ये काय म्हटलंय?

अॅपलने आपल्या अलर्ट मेसेजमध्ये म्हटलंय की, स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्स तुमच्या आयफोनला टार्गेट करु शकतात. तुमच्या वैयक्तिक माहितीच्या आधारी तुम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं. हॅकर्स तुमच्या फोनमधील संवेदनशील डेटा, कॅमेरा आणि मायक्रोफोन रिमोटली अॅक्सेस करु शकतात. इशारा गांभीर्याने घ्या, असंही कंपनीने म्हटलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं की, 'सायबर हॅकिंग... अॅपलने 6 विरोधी नेत्यांना इशारा दिला की 'स्टेट स्पॉन्सर्ड अटॅकर्सने त्यांचे आयफोन लक्ष्य केले असावे. आपल्या देशात काय चाललं आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com