पुणे शहरातील वाघोली परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील लॉजवर एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. सोमवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कोमल सुनील बर्के (वय-२०, वर्षे रा.चंदननगर,खराडी, पुणे ), सचिन गोकुळ शिंदे (वय-२१ वर्षे, सध्या रा खराडी.नेहरु कॉलनी भिंगार,अहमदनगर ) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सचिन आणि कोमल वाघोली परिसरातील एका लॉजवर गेले होते. (Latest Marathi News)
तिथे गेल्यानंतर दोघांनी एक रुम बुक केली. आम्ही सायंकाळी ६ वाजेपर्यंत लॉजमध्ये थांबणार त्यानंतर चेक आऊट करणार असं दोघांनीही लॉजच्या मॅनेजरला सांगितलं होतं. दरम्यान, सायंकाळी सहा वाजून गेल्यानंतही दोघेही रुममधून खाली आले नाही. त्यावेळी मॅनेजरने रुममध्ये कॉल केला.
वारंवार फोन करुनही कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने मॅनेजरने लॉजवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाहणी करण्यात सांगितले. यावेळी कर्मचाऱ्यांनी बेल वाजवली, तरी प्रेमीयुगुलांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर कर्मचाऱ्यांनी रुमचा दरवाजा उघडून आत बघितलं असता, प्रेमीयुगुल गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले.
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. प्रेमप्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कोमल ही डीएमएलटीचे शिक्षण घेत होती. तर सचिन हा खाजगी नोकरीला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.