Iran america war : युद्धादरम्यान KC-135 टँकर विमान कोसळलं; ४ क्रू मेंबर्सचा मृत्यू

Iran america war News : इराण-अमेरिका युद्धादरम्यान KC-135 टँकर विमान कोसळल्याची घटना घडली. ४ क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे.
Iran america
Iran america war News Saam tv
Published On
Summary

इराण-अमेरिका युद्धादरम्यान KC-135 टँकर विमान कोसळले

या दुर्घटनेत ६ पैकी ४ क्रू मेंबर्सचा मृत्यू

दोन विमानांची धडक झाल्याची शक्यता व्यक्त

अमेरिका-इराण युद्धादरम्यान इराकमध्ये आणखी एक विमान दुर्घटना घडली आहे. पश्चिम इराकमध्ये गुरुवारी अमेरिकीचे हवाई दलाचं KC-135 एरियल रिफ्यूलिंग टँकर क्रॅश झालं. विमानातील ६ क्रू मेंबर्सपैकी ४ जणांचा मृत्यू झाला. यूएस सेंट्रल कमांडने शुक्रवारी दोन विमानाची धडक झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला. एका विमानाचं सुरक्षितरित्या लँडिग करण्यात आलं आहे. तर दुसऱ्या विमानाच्या दोन क्रू मेंबर्सचा शोध सुरू आहे.

कुठे झाली दुर्घटना ?

विमान कोसळल्याची घटना ऑपरेशन एपिक फ्युरीदरम्यान फ्रंडली भागात घडली. विमान नेमकं कशामुळे कोसळलं, याचा तपास करण्यात येत असल्याचे सेंटकॉमने स्पष्ट केलं आहे. इराणचं पाठबळ असलेल्या इराकच्या इस्लामिक रेसिस्टेंस गटाने दावा केला आहे की, त्यांनी KC-135 विमान पाडलं आहे. परंतु अमेरिकेच्या सैन्य दलाने त्यांचा दावा फेटाळून लावला आहे.

Iran america
कालव्यात पोहोयला गेले पुन्हा परतलेच नाही; पाण्यातील सिमेंट पाईपमध्ये अडकून ३ तरुणांचा मृत्यू

KC-135 हे विमान १९५०-१९६० च्या दशकात बोईंगद्वारे तयार करण्यात आलंय. हे विमान अमेरिकेच्या हवाईदलाचं प्रमुख रिफ्यूलिंग प्लॅटफॉर्म मानले जाते. KC-135 हे लांब पल्ल्याच्या उड्डाणांदरम्यान लढाऊ विमानांना हवेतच इंधन भरते. युद्धाच्या सुरुवातीला अमेरिकेचे चौथे विमान हे दुर्घटनाग्रस्त झालं. मागच्या आठवड्यात कुवैतने अनावधानाने अमेरिकेचे तीन F-15E स्ट्राइक ईगल्स विमान पाडले होते. परंतु त्यातील सर्व पायलट बचावले होते.

Iran america
दहावीच्या पेपर तपासणीचा मोठा घोटाळा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार? VIDEO

युद्धादरम्यान अमेरिकेचे एकूण ७ सैनिक शहीद झाले आहेत. तर कुवैतमधील एका बंदरावर ड्रोन हल्ला झाला. त्यात ७ जणांचा मृत्यू झाला होता. तर सौदी अरबच्या एअरबेसवर हल्ला झाला. त्यातही एका सैनिकाचा मृत्यू झाला. पेंटागनच्या माहितीनुसार, आतापर्यंत युद्धात १४० अमेरिकी सैनिक जखमी झाले आहेत. यातील ८ जणांची प्रकृती गंभीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com