Pooja Khedkar 
महाराष्ट्र

Pooja Khedkar: वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर सर्वात मोठी कारवाई; प्रशिक्षण कालावधी संपुष्टात,देशातील पहिलीच घटना| Exclusive

IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई केलीय. खासगी कारवर लाल दिवा लावल्यानंतर त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या.

Bharat Jadhav

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट समोर आलीय. पूजा खेडकर यांचं जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिलेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाची कारवाई केलीय. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाकडून ही कारवाई करण्यात आलीय. अकादमीने महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले असून पूजा खेडकर यांना २३ जुलै पूर्वी मसूरी येथील अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. साम टीव्हीने वृत्त दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने ही कारवाई करण्यात आलीय.

खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरण यामुळे प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र इथपर्यंत पोहोचला. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली होती.

उपसंचालक एस. नवल यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांना दिलेल्या पत्रात, IAS-2023 बॅचच्या पूजा खेडकरचे प्रशिक्षण थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलंय. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी त्यांना तातडीने अकादमीत परत बोलावण्यात यावे. ट्रेनी व्यक्तीला तात्काळ कार्यमुक्त करावे, यासाठी राज्य सरकारला विनंती करण्यात आलीय. त्यांना लवकरात लवकर अकादमीत रुजू होण्याची सूचना करण्यात आलीय.

पूजा खेडकर यांच्यावर काय झालेत आरोप

अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी बनावट दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. रेशनकार्ड दाखवून आपलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळविले असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय.

प्रशिक्षणाच्या काळात केलेल्या अवास्तव मागण्या

प्रशिक्षणाच्या काळात केलेल्या अवास्तव मागण्यांमुळे खेडकर गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत.

चुकीचे कागदपत्रे

यूपीएससीची परीक्षा देतानाही त्यांनी अनेक चुकीची कागदपत्रे दिले असल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न काही लाखांच्या घरात असतानाही खेडकर यांनी नॉन क्रिमीलेअर दाखल्याच्या माध्यमातून फायदा घेतला. इतकेच नाही तर परीक्षा देण्याची मर्यादा संपल्यानंतरही त्यांनी परीक्षा दिल्याचं सांगितलं जातंय. पूजा खेडकर यांनी नाव बदलून परीक्षा दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: आज होणार अचानक धनलाभ, तर अनेकांचे जुळेल प्रेम; यात तुमची रास तर नाही ना?

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT