मुंबई : IAS पूजा खेडकरची चर्चा तिच्या कामगिरीमुळे नव्हे तर तिनं आणि तिच्या कुटुंबानं केलेल्या कारनाम्यांमुळे होतेय....पूजाच्या प्रकरणात रोज नवेनवे खुलासे होतायत. MBBSचं शिक्षण घेतलेली पूजा दिलीप खेडकर 2023 बॅचची IAS अधिकारी आहे. तिच्या निवडीवरच प्रश्न निर्माण झालंय. अंबर दिवा, केबिनपर्यंत पूजाचे कारनामे संपले नाहीत...तर तिथून सुरू झालेले कारनामे थेट तिनं 11 वेळा दिलेल्या यूपीएससीपर्यंत पोहचले आहेत.
दिव्यांगाचं प्रमाणपत्र -
पहिल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ‘दृष्टीदोष’, दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात डोळ्याची समस्या,अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्याचाही प्रयत्न
नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
22 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असूनही नॉन क्रिमीलेयर कोट्यातून अर्ज
वाहनाला अंबर दिवा -
प्रशिक्षणार्थी असूनही वैयक्तिक ऑडी कारला अंबर दिवा लावला
वरिष्ठांच्या कॅबिनवर कब्जा
अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या अँटी चेंबरमधील सर्व सामान काढून त्या ठिकाणी स्वत:च्या नावाचा बोर्ड
11 वेळा UPSCची परीक्षा -
UPSC परीक्षा देण्याचे प्रयत्न संपल्यानंतरही नाव बदलून तब्बल 11 वेळा परीक्षा
19-20पर्यंत खेडकर पूजा दिलीपराव नावाचा वापर
21-22ला पूजा मनोरमा दिलीप खेडकर नावाचा वापर
पुण्यात प्रशिक्षणार्थी असताना पूजा खेडकरनं अनेक सुविधांची मागणी केली. खरं तर या सुविधा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मिळत नाहीत. या सर्व प्रकरणानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून पूजा खेडकरची तक्रार केली. त्यानंतर पूजाची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली.
पूजा खेडकर प्रशिणार्थी IAS अधिकारी आहेत. IAS अधिकारी होण्यासाठी UPSCसारखी खडतर परीक्षा द्यावी लागते. मात्र अत्यंत संवेदनशील अशा UPSC बाबत असे प्रकार घडत असतील तर देशाचा कारभार भगवान भरोसेच आहे असंच म्हणता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.