प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची पुणे पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या प्रमाणपत्राची चौकशी करावी, दिव्यांग आयुक्त कार्यालयाकडून पुणे पोलिसांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलंय.
पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र यावरून देखील संशय येत असल्याने दिव्यांग आयुक्त कार्यालयाने चौकशी करण्याची मागणी केलीय. दिव्यांगाच्या संघटनेने पुणे पोलीस आणि दिव्यांग आयुक्त यांच्याकडे या प्रमाणपत्राची चौकशी करावी, अशी होती मागणी करण्यात आली होती. प्रमाणपत्र कुठून दिले गेले, कोणत्या जिल्ह्यातून मिळवले आणि कोणत्या डॉक्टर आणि रुग्णालयातून तपासणी केली, याबाबी तपासल्या जाणार जाणार आहेत.
दरम्यान आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार अखेर पुणे पोलिसांनी जप्त केलीय. खासगी ऑडी कारवर महाराष्ट्र शासन लिहिल्यामुळे तसेच लाल दिवा लावल्याने पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर आता पोलिसांनी ही ऑडी कार खेडकर यांच्या बंगल्यातून जप्त केलीय.
पूजा खेडकर यांच्यावर अजून एक गंभीर आरोप म्हणजे त्यांनी नाव बदलून तब्बल ११ वेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याचं सांगितलं जातंय. पूजा खेडकर यांनी नाव बदलून यूपीएससीची अटेम्प्ट वाढवून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. नावात बदल केल्याने खेडकर यांना त्यांच्या यूपीएससीचे प्रयत्न संपले असतानाही परीक्षा देता आल्याचा आरोप आहे.
नावात बदल केल्याने खेडकर यांना त्यांच्या यूपीएससीचे प्रयत्न संपले असतानाही परीक्षा देता आल्याचा आरोप आहे. पूजा खेडकरला १७ कोटींच्या मालमत्तेतून ४२ लाखांचं उत्पन्न मिळतं. तर वडिलांच्या नावावर ४० कोटींची मालमत्ता आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून युपीएससीला अर्ज भरताना ८ लाख रुपयांची नॉन क्रिमीलेअर मर्यादा असतानाही कोट्यावधींची संपत्ती असलेल्या पुजा खेडकरने चुकीची माहिती देऊन आयएएसपदी नियुक्ती मिळाल्याची बाब आता समोर आलीय.
पोलिसांनी बाणेर रोडवरील घराबाहेर पोलिसांनी नोटीस लावलीय. मनोरमा खेडकरांना नोटीस बजावल्याचं समोर आलंय. त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याबद्दल ही नोटीस असल्याचं सांगितलं जातंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.