मनोज जैस्वाल, साम टीव्ही, प्रतिनिधी
नाव बदलून तब्बल 11 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली, असा गंभीर आरोप वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकरी पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आला आहे. यावर त्यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या आहेत की, ''माझ्यावर विविध आरोप करण्यात आले आहे. मात्र याशी संबंधित समिती मला जे काही प्रश्न विचारणार त्यावर मी पूर्णपणे स्पष्टीकरण देणार.''
पूजा खेडकर म्हणाल्या आहेत की, ''माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे काही जरी असले तरी, भारतीय संविधानाने अधिकार दिला आहे की, जोपर्यंत एखाद्यावर केलेला आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत ती व्यक्ती दोषी होत नाही.''
खेडकर म्हणाल्या, ''कोणी काही आरोप केले तरी, मात्र माझं उत्तर मी नेमलेल्या समिती समोर सादर करणार आहे. ते दाखल करण्यात आलेले दस्तावेज असतील किंवा प्रमाणपत्र असतील, ते मी समिती समोर मांडणार. सर्वसामान्य जनतेला माहित आहे, प्रशासन कसं चालते आणि सगळे काम कशी होतात.''
दरम्यान, पूजा खेडकर यांनी नाव बदलून यूपीएससीची अटेम्प्ट वाढवून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. नावात बदल केल्याने खेडकर यांना त्यांच्या यूपीएससीचे अटेम्प्ट संपले असतानाही परीक्षा देता आल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१९–२० मध्येच त्यांचे अटेम्प्ट संपवले होते. त्यांनी नावात बदल केल्यानेच यूपीएससीच्या फिल्टरमध्ये त्या अडकल्या नाहीत. ओबीसी म्हणून पूजा खेडकर यांना ९ वेळाच यूपीएससीची परीक्षा दिली होती. पूजा खेडकर यांनी २०१९-२० पर्यंत खेडकर पूजा दिलीपराव या नावानं यूपीएससीची परीक्षा दिली. तर २०२१ आणि २०२२ ला त्यांनी नावात बदल करत पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने यूपीएससीची परीक्षा दिली. यूपीएससीमध्ये पूजा खेडकर यांच्या दोन्ही नावांच्या लिस्ट आहेत. याचीच आता तपासणी केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.