Youth Death During Ganesh Visarjan 2024:  Saamtv
महाराष्ट्र

Ganpati Visarjan 2024: बाप्पाचे विसर्जन करताना सख्ख्या भावांचा मृत्यू, धुळ्यातील हृदयद्रावक घटना; अमरावतीत ३ जण वाहून गेले

Youth Death During Ganesh Visarjan 2024: एकीकडे मोठ्या जल्लोषात गणरायाला निरोप दिला जात असतानाच अनेक ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडल्या होत्यात. बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन करताना बुडून मृत्यू झाल्याच्या घटना नाशिक, अमरावतीमधून समोर आल्या आहेत.

Gangappa Pujari

Maharashtra Ganpati Visrjan 2024: मंगळवार सकाळपासून (ता. १८ सप्टेंबर) राज्यभरात गणपती विसर्जनाचा जल्लोष अन् उत्साह पाहायला मिळत आहे. कुठे ढोल- ताशांच्या गजरात तर कुठे डीजेच्या दणदणाटात लाडक्या बाप्पाला निरोप दिला गेला. ११ दिवस लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर निरोप देताना गणेशभक्तही भावूक झाले. एकीकडे मोठ्या जल्लोषात गणरायाला निरोप दिला जात असतानाच अनेक ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडल्या होत्यात. बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन करताना बुडून मृत्यू झाल्याच्या घटना नाशिक, अमरावतीमधून समोर आल्या आहेत.

अमरावतीत ३ जण वाहून गेले..

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील इसापूर येथे गणपती विसर्जनावेळी दोघे पूर्णा नगर नदीपात्रात वाहून गेल्याची घटना घडली आहे. मयूर गजानन ठाकरे, अमोल विनायक ठाकरे अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. दुसरीकडे दर्यापुर तालुक्यांतील दारापूर येथील गणपती विसर्जनात राजेश संजय पवार (वय, २७) हा युवक पाण्यामध्ये बुडाला. जिल्हा शोध बचाव पथक आज पूर्णा नदीत पात्रात दाखल होणार असून शोध सुरू होणार आहे.

पंढरपूर, परभणीतही दुर्घटना..

गणपती विसर्जन करताना चंद्रभागा नदीत एक जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रभागा नदीवरील अहिल्या पुलावरून गणेशमूर्ती विसर्जन करताना तोल जाऊन 40 ते 50 फूट उंचीवरून नदीत पडला. मध्यरात्री एक वाजता ही दुर्दैवी घटना घडली असून पोलीस आणि नातेवाईकांकडून गणेशचा शोध सुरू आहे. दुसरीकडे परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मौजे चांदज येथे गणेश सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जना दरम्यान करपरा नदीमध्ये भागवत कल्याण अंभोरे (वय 13 वर्षे) मुलगा वाहून गेला. महसूल व पोलीस प्रशासन मुलाचा शोध घेत आहेत..

धुळ्यात सख्ख्या भावांचा मृत्यू

गणपती उत्सवाला धुळ्यात गालबोट लागले असून एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. गणपती बुडवण्यासाठी गेले असता तलावाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे या दोघेही भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्यासह आणखी एक मित्र विसर्जनासाठी गेला होता परंतु तो मात्र सुदैवाने बचावला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे. ओम पाटील व यश पाटील या दोघा दुर्दैवी मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत, धुळे शहरातील बिलाडी परिसरामध्ये असलेल्या वारे नगर येथील हे दोघेही भावंड असून, गणपती बुडवण्यासाठी ते परिसरातील तलावात गेले असता ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT