बाजारात विकणारी केळी नैसर्गिक आहेत की केमिकल, कशी ओळखाल?

Manasvi Choudhary

केळीचे फायदे

केळी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जातात. केळीचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

Banana

केमिकल केळी

अनेकजण नियमितपणे केळी खातात. मात्र आजकाल नैसर्गिक रित्याच नाही तर केमिकलयुक्त केळी बाजारात विकली जातात.

Banana

'कॅल्शियम कार्बाइड' रसायन

केळी पिकवण्यासाठी 'कॅल्शियम कार्बाइड' या हानिकारक रसायनांचा वापर केला जातो जो आरोग्यासाठी घातक आहे.

Banana

रंगावरून ओळखा

केमिकलने पिकवलेली केळी ही गडद पिवळ्या रंगाची असतात आणि या केळ्यांवर डाग नसतो. नैसर्गिकरीत्या पिकलेली केळी हलकी पिवळी किंवा फिक्कट रंगाची असतात. त्यावर काही प्रमाणात काळे किंवा तपकिरी डाग असतात.

Banana Benefits

चव

केमिकलने पिकवलेली केळी ही चवील कडवट असतात तसेच ही केळी कच्ची किंवा कडक असू शकतात. त्यांचा गोडवा नैसर्गिक नसून तोंडाला कडवटपणा जाणवतो.

Banana | GOOGLE

केळी मऊ नसतात

केमिकलने पिकवलेली केळी हातात घेतल्यावर कडक लागतात. ती दिसायला टवटवीत असतात पण दाबली तरी सहजासहजी दबली जात नाहीत. नैसर्गिक केळी ही मऊ असतात.

Banana

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Trending Mangalsutra Designs: मंगळसूत्राच्या लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन्स, सोन्याच्या वाटीसह 'मोती आणि खड्यांचे' फॅन्सी पॅटर्न

mangalsutra importance | google
येथे क्लिक करा...